Royal politicsटॉप पोस्ट

राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी बसपाच्या उपाध्यक्षाची मायावतींकडून हकालपट्टी

0

बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असलेल्या जय प्रकाश सिंह यांची राहुल गांधी आणि कुटुंबाबद्दल अपशब्द बोलल्याने बसपा च्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

काँग्रेस बद्दल बोलल्याने आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाला थेट पक्षातून हाकलून देणे यामुळे सध्या मायावती आणि अपशब्द बोलणाऱ्या जय प्रकाश सिंह हे चांगलेच चर्चेत आलेत. जय प्रकाश सिंह कोण हे लोकांना आता जाणून घेण्याची इच्छा झाली आहे.

Loading...

पण त्या आधी जय प्रकाश सिंह नक्की काय बोलले की त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले.

लखनऊ येथील एका कार्यक्रमात जय प्रकाश सिंह म्हणाले की, राहुल गांधी हे मूलतः विदेशी असून ते देशाचे नेतृत्व करण्यास अयोग्य आहेत. राहुल गांधी हे आपल्या आई सांगतील त्या प्रमाणे वागतात असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकी बद्दल बोलताना ते म्हणाले की, “देश के नेता का फैसला ‘पेट’ से नही तो ‘मतपेटी’ के जरिये होगा”।

या कार्यक्रम ते असे देखील म्हणाले की, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीनंतर मायावती शक्तिशाली नेता म्हणून समोर आल्या आहेत. एच डी कुमारस्वामी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्यात मायावतींची महत्वाची भूमिका होती.

मोदी आणि अमित शाह यांच्या सततच्या विजयाच्या घोडदौडीला जर कोणी रोखू शकत तर त्या मायावतीच आहेत.

कोण आहे जय प्रकाश सिंह-

जय प्रकाश सिंह हे वकील असून नोएडा चे राहणारे आहेत. मायावती यांनी त्यांना 26 मे ला पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. परंतू जय प्रकाश सिंह या आधी कधीच आमदार किंवा खासदार झालेले नाहीत.

तरुणांना बसपाकडे खेचण्यासाठी जय प्रकाश यांना उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. ते 2009 पासून पक्षासाठी काम करीत आहेत. राजस्थान मध्ये देखील पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Loading...

कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कायदा बनवा – सुप्रीम कोर्ट

Previous article

हिंदू की मुस्लिम ? राहुल गांधींनी स्पष्ट केले काॅंग्रेस कोणाचा पक्ष

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *