खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास नडला, आईसलॅंडने बरोबरीत रोखले

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमधील डी ग्रुपमधील विजेते पदाची प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाला आज वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या आईसलॅंडने 1-1 असे बरोबरीत रोखले. मेस्सीला त्याच्या नावाप्रमाणे आज खेळ करता आला नाही. त्याने सामन्यात एकही गोल केला नाही.

अर्जेंटिनातर्फे 19 व्या मिनिटाला सर्जिओ अॅग्युरोने गोल करत संघाला 1-0 ने आघाडी घेतली; पण अर्जेंटिनाला ही आघाडी जास्त वेळ टिकवता आली नाही. चारच मिनिटांनी 23 मिनिटाला आईसलॅंडतर्फे अलफरीओ फिनबोग्सनने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यतंराला दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.

Loading...

मध्यंतरानंतर अर्जेटिनाला आघाडी घेण्याची संधी होती; पण 64 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रुपांतर मेस्सीला गोलमध्ये करता आले नाही.आईसलॅंडचा गोलकिपर हेन्स थोरने त्याचा बाॅल अडवला.

एक्सट्रा टाईममध्ये देखील दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे आईसलॅंडला  अर्जेंटिनाला 1-1 असे बरोबरीत रोखण्यात यश आले.

मॅचमध्ये 73 % वर्चस्व अर्जेटिनाचे होते तर 27 % आईसलॅंडचे वर्चस्व होते.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/FIFA)

Loading...

FIFA WC 2018 : पाॅल पोगबाच्या गोलच्या मदतीने फ्रांसने केली आॅस्ट्रोलियावर मात

Previous article

FIFA WC 2018 : 36 वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या पेरूचा पराभव, पाॅलसनच्या गोलच्या मदतीने डेनमार्कचा विजय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ