Royal Entertainmentमुख्य बातम्या

आजची माता आहे माता चंद्रघंटा, जाणून घ्या माता चंद्रघंटा कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

0

माता चंद्रघंटा: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये माताला चंद्राच्या आकाराच्या घंटांच्या दागिन्यांनी सजवितात. चंद्राचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे. घंटेचा ध्वनी विचलित मनाला क्षणांत वर्तमानात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मनांत देखील सतत बदल होत असतात.
चंद्रघंटा मातेची कथा : देव-असूरात घनघोर यु’द्ध सुरू होते. असूरांकडून देवांची सेना सतत पराजित होत होती. एक वेळ तर अशी आली की, असूरांनी देवांवर विजय मिळवून इंद्रलोक काबीज केला. यु’द्ध हरल्यामुळे निराश होऊन सगळे देव ब्रह्मदेवाकडे साहाय्य मागण्यासाठी गेले. त्यांनी भगवान विष्णू आणि श्रीशिवशंकराची मदत घ्या असे सांगितले देव त्यांच्याकडे गेले.
असूर पंचमहाभूतांना बंदी बनवून भू-लोकी अत्याचार माजवत आहेत, हे सर्व ऐकून या तीन देवांना संताप आला. या क्रोधामुळे त्यांच्या तोंडून एक महान प्रकाशाचा गोळा प्रकट झाला. आणि त्यातून चंद्रघंटा माताचा उगम झाला, असे मानले जाते. विष्णूंनी तिला आपल्याकडील चक्र, श्रीशिवशंकरांनी त्रिशूल दिले. प्रत्येक देवाने आपल्याकडील अमोघ शक्ती माताला दिली.
सर्वात शेवटी इंद्राने आपल्या ऐरावतावरून उतरून आपल्याकडील घंटा दिली. या मातेच्या हातात खूप शस्त्रं दिसतात, ती यामुळेच. मग माता त्या असूरांशी यु’द्ध करायला निघून गेली. हे यु’द्ध देखील बराच काळ चाललं. या माताचे वाहन असलेल्या सिंहाने आपले रूप प्रकट करून तो त्या सर्वावर चालून गेला. अशा प्रकारे मातेने त्या दु’ष्टांचा संहार करून इंद्राला त्याचे लोक पुन्हा परत मिळवून दिले.
चंद्रघंटा मातेच्या पूजनाने सर्व कष्टांना मुक्ती मिळते असे मानतात. तिचं रूप परम शांतीदायक व कल्याणकारी मानलं जात. तिच्या मस्तकावर शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळेच या माताला चंद्रघंटा म्हटले जाते. हिच्या शरीराचा रंग अगदी सोन्यासारखा चमकदार असतो. तिला दहा हात असून त्या हातात खड्ग, श’स्त्रे, बा’ण, अ’स्त्र इ. विराजमान आहे. माताच्या चेहऱ्यावर सतत युद्धासाठी तयार असा भाव आहे.
तिच्या याच क्रोधामुळे अनेक अत्याचारी रा’क्ष’स, दै’त्य, अ’सू’र, तिला नेहमी घाबरून असतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साधना करणाऱ्या भाविकांचे मन ‘मणिपूर’ चक्रामध्ये प्रविष्ट होत असतं, असं मानतात. माता चंद्रघण्टेमुळे भाविकांना अलौकिक दर्शन होतं, दिव्य साक्षात्काराचा अनुभव येतो. साधना काळात तपश्चर्या करणाऱ्याला अत्यंत सावध राहावे लागते. माता चंद्रघंटेच्या कृपेने ही साधना करणाऱ्या लोकांच्या सगळ्या अडचणी दूर होतात.
तिची आराधना अतिशय फलदायी असते. तिच्या सतत युद्धासाठी तयार असलेल्या मुद्रेमुळे भक्तांच्या अडचणी निवारण करायला ती लवकर येते. तिचे वाहन सिंह असल्यामुळे उपासक सुद्धा सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतात. तिच्या मस्तकी असलेल्या घण्टेच्या नादाने भक्तांचे रक्षण होते. तिचं ध्यान करणाऱ्या भक्ताने मनोभावे केलेला घंटानाद ऐकून माता त्याच्या मदतीसाठी जाते. दु’ष्टाचे दमन आणि विनाश करण्यात ती सदैव तप्तर असते. दर्शनासाठी आलेल्या तसंच आराधना करणाऱ्यासाठी तिचं रूप अत्यंत सौम्य असते. चंद्रघंटा मातेच्या आराधनेमुळे सद्गुण प्राप्त होऊन सौम्यता, विनम्रता यांचा विकास होत असतो. तिच्या दर्शनाने उपासकांना शांती आणि सुखाचा अनुभव येतो.
माता चंद्रघंटा स्तोत्र :
आपदुद्धारिणी त्वंहि आद्या शक्ति शुभपराम्।
अणिमादि सिद्धिदात्री चंद्रघंटा प्रणमाभ्यम्
चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टं मन्त्र स्वरूपणीम्।
धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघंटे प्रणमाभ्यहम्
नानारूपधारिणी इच्छानयी ऐश्वर्यदायनीम्।
सौभाग्यारोग्यदायिनी चंद्रघंटप्रणमाभ्यहम्
चंद्रघंटा माता पूजन विधी : चौरंगावर कापड घालून चांदीचा किंवा मातीचा कलश पाणी भरून ठेवावा. त्यानंतर संकल्प सोडून तांब्याला कुंकवाची पाच बोटे लावून त्यावर विडय़ाची पाच पाने ठेवून नारळ ठेवावा. त्यामध्ये फुलं, अक्षदा, हळद-कुंकू, सुपारी, रुपया, चंदन, दुर्वा घालून वर नारळ ठेवावा. नंतर मातेला नवेद्य दाखवून आरती करावी.
चंद्रघंटा माता पूजन महत्त्व : चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाचे सगळे अडथळे दूर होतात. तिच्या कृपेने साधक पराक्रमी आणि निडर बनतो. चंद्रघंटा मातेची पूजा केल्यामुळे मातेला सर्व प्रकारच्या दु:खांपासून मुक्तता मिळते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेची आराधना केल्याने भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांती मिळते. मातेच्या उपासनेने कुंटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !
The post आजची माता आहे माता चंद्रघंटा, जाणून घ्या माता चंद्रघंटा कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर… appeared first on STAR Marathi News.

19 ऑक्टोबर : ह्या 6 राशींच्या लोकांना येणार दैवी कृपेची प्रचिती, होईल धन आणि सुखाची बरसात

Previous article

या 6 राशींचे तारे चमकणार, भगवान श्रीशिवशंकरांच्या कृपेने मोठा धन लाभ मिळण्याचा योग बनत आहे…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.