तंत्रज्ञानभारतमुख्य बातम्या

मारुती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात

0

आर्थिक मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे बऱ्याच कंपनीने आपली उत्पादने थांबवली आहेत. मारुती सुझुकीने तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू  केले नाहीत, कारच्या किंमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची खरेदी मंदावली आहे, असं कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर्स बैठकीत भार्गव यांनी सांगितले.

देशात वेगाने उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीत घट होत आहे. जुलैमध्ये वाहन उत्पादन 17 टक्क्यांनी घटला आहे. NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनेन्शिअल इन्स्टीट्यूशन स्वत: आर्थिक अडचणीत सापडली आहे.

मुळे डीलरशीप बंद होत आहे. GST मध्ये झालेली वाढ, नोटबंदीमुळेही ऑटो इंडस्ट्रीमध्ये  मंदी आली आहे.ऑटो इंडस्ट्रीशिवाय इतर क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. पारलेजी , ब्रिटानीया यांनीही आपल्या कंपनीतून अनेक कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.

 

दीड वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार,डोकं आपटून निर्घृण हत्या

Previous article

राष्ट्र्वादीत भूकंप: काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.