Royal politicsटॉप पोस्ट

व्हिडिओ | या पंतप्रधानाने केली चक्क वायपर घेऊन सफाई

0

नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट यांचा एक व्हिडिओ दोन दिवसापासून सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडियो मध्ये मार्क रूट हे जमिनीवर सांडलेली काॅफी स्वताच साफ करताना दिसून येत आहेत.

झाल असं की, मार्क रूट हे कॅबिनेटच्या बैठकीला जात होते. त्यांच्या एका हातात काॅफी तर दुसऱ्या हातात फाईल्स व काही महत्वाचे सामान होते. त्यांच्या बरोबरच्या व्यक्तीबरोबर ते बोलत चालले असताना त्यांचा हात दरवाजाला लागल्याने त्यांच्या हातातील काॅफी जमीनीवर सांडली. जमीनीवर सांडलेली काॅफी पुसण्यासाठी आलेल्या कामगाराच्या हातातील वायपर घेत ते स्वताच साफ करतात.

Loading...

मार्क रूट यांचा हा व्हिडिओ आपल्याला भारतातील स्वच्छता अभियानाची आठवण करून देतो. फक्त व्हिडिओ व फोटोमध्ये येण्यासाठी झाडू घेऊन सफाई करणाऱ्या नेत्यापेक्षा नेदरलॅँडचे पंतप्रधान मार्क रूट हे सरस ठरतात.

भारतातील नेत्यांनी व लोकांनी या व्हिडिओमधून स्वच्छता अभियानाविषयी नक्कीच काहीतरी शिकावे. कारण स्वच्छता अभियानाची काय वाट लागली आहे हे आपण पाहतच आहोत.

नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूटचे हे कार्य  विना जाहिरातबाजी करता स्वच्छतेविषयी मोठा संदेश देते व यासाठी त्यांची प्रशंसा देखील केली पाहिजे.

 

(PHOTO INPUT :- FACEBOOK/MARKRUTTE)

Loading...

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी ५ जणांना अटक

Previous article

कर्ज महागणार; आरबीआय कडून रेपो रेट मध्ये वाढ

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *