Royal politicsटॉप पोस्ट

ही होती करुणानिधी यांची शेवटची इच्छा, मुलगा स्टालिनने केली पूर्ण

0

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्यावर आज मरीना बीचवर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याशी जोडली गेलेल्या अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहे. यांमध्ये द्रविड़ मुनेत्र कड़गमचे (डीएमके) नेता एम. के. स्टालिन यांनी आपल्या दिवंगत वडिल आणि पार्टीचे नेता करूणानिधी यांना भावूक पत्र लिहिले आहे.

या पत्रात स्टालिनने सांगितले आहे की, त्यांच्या वडिलांनी तीस वर्षाआधी त्यांच्या शवपेटीवर (coffin-कब्र) एक संदेश लिहिण्याची इच्छा दर्शवली होती.

Loading...

स्टालिनने आपल्या वडिलांना संबोधित करत लिहिले की, “तीस वर्षा आधी, तुम्ही म्हणाला होता की, तुमच्या शवपेटीवर हे शब्द अंकित करण्यात यावे…….एक व्यक्ती जो नेहमी विना आराम करता काम करत राहिला, आता कुठे त्याला आराम मिळाला आहे. ”

पूर्ण झाली करूणानिधी यांची शेवटची इच्छा – 

स्टालिनने त्यांच्या वडिलांची जी शेवटची इच्छा सांगितली होती, ती पुर्ण केली आहे.

करूणानिधींसाठी जी शवपेटी तयार करण्यात आली होती, त्यावर लिहिले होते की, एक व्यक्ती जो नेहमी विना आराम करता काम करत राहिला, आता कुठे त्याला आराम मिळाला आहे. 

मी तुम्हाला अप्पा म्हणून बोलवू शकतो का – स्टालिन

पत्रामध्ये स्टालिनने लिहिले की,  “अप्पा, अप्पा म्हणायच्या एेवजी मी तुम्हाला अनेक वेळा थलाइवरय, थलाइवरय (माझे नेता) म्हणून बोलवले. थलाइवरय मी तुम्हाला एकदा अप्पा म्हणून बोलवू का.”

Loading...

महाराष्ट्र सरकारचा यू-टर्न, बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये घेऊन जाण्यास बंदी

Previous article

पुणेकरांनो, आता थेट तक्रार नोंदवा पोलिस कमिशनरांच्या व्हाॅट्स अॅपवर, हा आहे नंबर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *