Royal politicsटॉप पोस्ट

महाराष्ट्र सरकारचा यू-टर्न, बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये घेऊन जाण्यास बंदी

0

बाहेरील खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जातंय..? जर थांबा.! कारण महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय बदललाय. आणि मल्टिप्लेक्समध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील खाद्य पदार्थ नेऊ नये याचे समर्थन केले आहे. या निर्णयाने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला चांगलेच फैलावर घेतले आहे.

लोक सार्वजनिक ठिकाणी घरातील किंवा बाहेरील खाद्यपदार्थ स्वतः जवळ बाळगतात. तेव्हा सुरक्षेचा मुदा निर्माण होत नाही, मग फक्त मल्टिप्लेक्स मध्येच कसा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा कानपिचक्या न्यायालयाकडून राज्यसरकरला आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला दिल्या.

Loading...

मल्टिप्लेक्समध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील आणि घरातील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असणे योग्य असल्याचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र राज्यसरकारने उच्च न्यायालयात दाखल केले होते आणि त्यावर याचिका निकाली काढण्याची मागणी देखील सरकारकडून करण्यात आली होती.त्यावर आज उच्च न्यायालयाकडून सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने फक्त घरच्याच खाद्यपदार्थाची सुरक्षा धोक्यात येते का? असा सवाल केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात करण्यात येणाऱ्या खळखट्याकमुळे न्यायालयाने होणाऱ्या मारहाणीवर आणि तोडफोडीवर नाराजी व्यक्त केली. कायदा हातात घेण्याची कोणालाही गरज नाही असे देखील न्यायालयाने संगितले.

महाराष्ट्र सरकारचा मल्टीप्लेक्स खाद्यपदार्थ बंदीवरून घुमजाव-

आता तुम्ही बिनधास्त मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकता असे सांगत महाराष्ट्र सरकारच्या अनेक नेत्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला पण आता त्याच सरकारने आपल्या निर्णयावरून घुमजाव केला आहे. आणि मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांवर बंदी असणेच योग्य असल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

‘महाराष्ट्र सिनेमा नियमन या नियमांनुसार मल्टीप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, त्याला परवानगी दिली तर सुरक्षेच्या दृष्टीने ती मोठी समस्या ठरेल. प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या त्या मल्टीप्लेक्सची जबाबदारी असते. त्यामुळे ही बंदी योग्यच आहे. यामुळे सध्याच्या नियमात सुधारणा करण्याची गरज नाही’ असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले. 

मल्टीप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणण्याच्या बंदी विरोधात जैनेंद्र बक्षी यांनी उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर ला घ्याण्यात येणार आहे.

Loading...

एकदाही निवडणूक न हरलेल्या एम करुणानिधी यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Previous article

ही होती करुणानिधी यांची शेवटची इच्छा, मुलगा स्टालिनने केली पूर्ण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *