मुख्य बातम्या

OBCमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठ्यांनी पडू नये – प्रकाश आंबेडकर

0

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका स्थगितीमुळे मराठा समाजाने घाबरू नये, कोर्टाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसीचं म्हणणं आहे आमचं ताट आमच्याकडेच राहू द्या, आमच्या ताटात वाटणी नको, आम्हाला कोणी नको आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावं पण आमच्या ताटातलं मिळू नये, अशी मागणी ओबीसी समाजातून येत असल्याचं सोशल मीडियातून वाचायला मिळत आहे. त्यामुळे सर्व मराठा पुढाऱ्यांना विनंती आहे त्यांनी मराठा आरक्षण गुंतागुंतीचा करू नका, ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये, मराठा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात मराठा समाज १६ टक्के आहे पण देशभरात केवळ २ टक्के आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशभरातील ओबीसी एकत्र आला तर राज्यात जे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे तेही मिळणार नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक स्थगिती दिली म्हणून घाबरु नका, अंतिम सुनावणीत मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्ट विचारात घेईल. मराठा समाजाच्या बाजूने निकाल देईल.
महत्वाच्या बातम्या :-
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल
सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत ; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका
10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
‘स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले
प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. OBCमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठ्यांनी पडू नये – प्रकाश आंबेडकर InShorts Marathi.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी क्वीन चित्रपट निर्माता मधु मांटेनाला NCBचा समन्स !

Previous article

99% शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात म्हणून लोकसभेतील खासदार त्यांना किंमत देत नाही

Next article

You may also like

Comments

Comments are closed.