टॉप पोस्टराजकारण

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार; उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी

0

मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांति मूक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये  मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा आणि याशिवाय अन्य प्रश्न घेऊन मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. परंतू सरकारकडून मोर्च्यामध्ये करण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

मराठा समाजबांधव पुन्हा आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर-

Loading...

याच कारणाने आता पुन्हा आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णयात मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. यासाठी काल तुळजापूर मधील तुळजाभवानी मंदिरात देवीचा जागर गोंधळ घालत मराठा समाजाने पुन्हा नव्याने मोर्चाची हाक दिली आहे. आपल्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल 29 जून ला हजारोच्या संख्येने मराठा बांधव सकाळी 11 वाजता तुळजापूरातील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यापासून भवानी रोड मार्गे मार्गस्थ होऊन तुळजाभवानी मंदिरासमोर जमा झाले.

मराठा समाज्याच्या आरक्षण विषयी उच्च न्यायालयात सुनावणी-

याच दिवशी उच्चन्यायालयात मराठा समाज्याच्या आरक्षण प्रश्नी सुनावणी घेण्यात आली. मराठा आरक्षणासंबंधित आयोगाने आपल्या कामाचा वेग वाढवून काम करावे अशी सूचना केली, तसेच सरकरनेही माहिती संकलनाचे काम वेगाने पूर्ण करावे असा निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित आहे, यासंदर्भात तातडीने पावले उचलावी, या संबंधित निर्देश न्यायालयाने देण्याची विनंती मराठा समाज्याने केली आहे. राज्य सरकारने मराठा समाज्याला आरक्षण दिल्यानंतर न्यायालयाने आरक्षणाच्या कायद्याला दुरुस्त करण्याला स्थगिती दिली होती. आणि सरकारकडून ह्या विषयी आयोग गठित केला होता.

या संबंधित सुनावणी न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. रणजित मोरे यांच्या खंडपीठाने केली. यावेळी सरकारी वकील रवी कदम यांनी स्पष्ट केले की, मराठा समाज्याच्या सध्याच्या परिस्थिती बाबतची माहिती गोळा करण्याचे काम 5 संस्थांकडून जिल्हा आणि तालुका या आधारावर केले जात आहे. या माहितीच्या आधारे मराठा समाज किती मागास आहे याचे प्रमाण कळेल आणि या आधारे राज्याकडून गठित करण्यात आलेला आयोग निर्णय घेईल.

तसेच माहिती मिळवण्याचे काम कधी पर्यंत पूर्ण होईल या न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारी वकील रवी कदम म्हणाले की, माहिती गोळा करण्याचे काम 31 जुलै पर्यंत पूर्ण होईल तर आयोगाला काम पूर्ण करण्यास 3 महिन्याचा कालावधी तरी लागेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
आयोगाने यावर आधीच दीड वर्ष खर्च केल्याने आता आणखी 3 महिन्याचा कालावधी मागत असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली, आणि 14 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देत त्याच दिवशी आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी असे देखील ठणकावले आहे.

तर काल पुन्हा मराठा क्रांति मूक मोर्चाला सुरुवात करण्याचा निर्णय मराठा समाजाकडून दिल्या नंतर सांगण्यात आले की, हा आता शेवटचा मोर्चा असेल जो शांततेत निघेल आणि आता आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास या पुढे शांततेत मोर्चे निघणार नाही, जे होईल ते थेट होईल आता इशारच मराठा समाज बांधवांकडून देण्यात येत आहे.

Loading...

Sanju Movie Review : खलनायक नहीं नायक हू मैं

Previous article

Hockey Champions Trophy 2018: भारताचा हाॅकी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये प्रवेश, नेदरलॅंडविरूध्दचा सामना ड्राॅ

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *