Royal politicsटॉप पोस्ट

मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाकडून बंद मागे, शांतता राखण्याचे आवाहन

0

मुंबई-

मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईमध्ये पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला आहे. त्याच बरोबर लोकांना शांतता राखण्याचे  आवाहन समाजाच्या नेत्यांनी केले आहे.

Loading...

मुंबई व उपनगरात हा बंद पुकारण्यात आला होता. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.  या बंदामधून शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यांना वगळ्यात आले होते.

ठाणे येथे अनेक रेल्वेंवर दगडफेक करण्यात आली. तसेच लोकल देखील थांबवण्यात आली होती.

तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले मराठा आरक्षणाविषयी म्हणाले की, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मी आंदोलकांना शांततामय पध्दतीने आंदोलन करण्याचे आवाहन करतो. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आवश्यकता आहे, .

आज दुपारी आंदोलकांकडून मुंबई – पुणे हायवे ब्लाॅक करण्यात आला होता. तसेच पनवेल येथे देखील मुंबई-गोवा हायवे बंद करण्यात आला होता

बांद्रा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांतडून हात जोडून दुकाने बंद करण्याची विनंती केली.

काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. बस-गांड्यांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच टायर जाळण्यात आले.

 

Loading...

उद्या होणाऱ्या पाकिस्तानमधील निवडणूकीविषयी जाणून घ्या 10 खास गोष्टी

Previous article

मेहसाणा दंगलप्रकरण- हार्दिक पटेल यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *