Royal Entertainmentटॉप पोस्ट

Manto Trailer : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा एक असा लेखक, ज्याने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला निवडले

0

कथा काय असतात, समाज्याचा आरसा… ज्या घटना समाज्यात घडतात त्या समाज्यापुढे आणण्याचे एक वैचारिक माध्यम आणि हेच काम एक लेखक करीत असतो. अशाच लेखकाची कहानी दिग्दर्शक नंदिता दास घेऊन येत आहे ‘मंटो’ या सिनेमातून. मंटोचा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. वायकॉम 18 मोशन पिक्चरचा हा  सिनेमा असून दिग्गज अॅक्टर नवाजुद्दीन सिद्धीकी यात लेखक सआदत हसन मंटो यांच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा बायोपिक पद्धतीने दिग्दर्शक नंदिता दास यांच्याकडून मांडण्यात आला आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहता असे दिसते की ही कथा भारत पाकिस्तान फाळणीपूर्वीची आहे. यात एक असा लेखक दाखवण्यात आला आहे ज्याला आपल्या कथा, उपन्यास लेखनामुळे स्वातंत्र्यापूर्वी आणि  स्वातंत्र्यानंतर बराच वेळा जेलमध्ये जावे लागले. ते लेखक आहे सआदत हसन मंटो. ज्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

manto
Loading...

Manto

स्त्रीदुखावर भाष्य करणारा लेखक- 

त्यांच्या कथा संग्रहांमधून समाज्यातील स्त्रियांच्या दुखाबद्दल  नेहमीच भाष्य केले आहे. मंटो यांनी त्यांच्या जीवनात 22 लघुकथा संग्रह, 1 उपन्यास तसेच रेडियो नाटकाचा संग्रह देखील प्रकाशित केला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ‘ठंडा गोश्त’ या कहाणीचे देखील वर्णन करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्यावर मानहाणीचा खटला दाखल करण्यात आला होता. ठंडा गोश्त सारखे त्यांनी खोल दो, टोबा टेक सिंह, बू या सारख्या अनेक कथा, लघुकथा  लिहिल्या, ज्या त्या काळात आणि आज देखील लोकप्रिय आहेत. त्याच्या कथांवर अश्लीललतेचे आरोप देखील करण्यात आले.

manto

Manto

ट्रेलरमध्ये एक सीन घेण्यात आला आहे. ज्यात मंटो त्यांच्या पत्नीच्या पोटावर हात ठेवून म्हणतात की, ‘तुम आझाद हिंदुस्तान मे पैदा होगे.’ आणि अचानक त्यानंतर कथा 1948 सालच्या काळात जाऊन पोहचते जी लाहोरमध्ये सुरू होते. म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर. त्यावेळी ते म्हणतात की, ‘जेव्हा गुलामगिरीत होतो तेव्हा स्वतंत्र होण्याची स्वप्न बघायचो, पण आता स्वतंत्र झाल्यावर कोणती स्वप्न बघायची.’

यात थोड्या प्रमाणात कोर्ट ड्रामा देखील दिसणार आहे. मंटो यांच्या कथासंग्रहातील अनेक डायलॉग यात  वापरण्यात आले आहे. जे कथेला नक्कीच वेगळे वळण देतील, आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील. या ट्रेलरमध्ये शेवटी एक डायलॉग आहे, ‘पाकिस्तान अँड हिंदुस्तान अँड मंटो’. आता ही पाकिस्तान अँड हिंदुस्तान अँड मंटो संपूर्ण स्टोरी काय आहे हे आता सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

manto (real)

Manto (real)

ट्रेलर मधून नवाज या भूमिकेला न्याय देण्यास पूर्णता यशस्वी ठरणार असे दिसते आहे, या सिनेमा 21 सप्टेंबरला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ऋषि कपूर, जावेद अख्तर, परेश रावल हे देखील असणार आहेत.

या सिनेमाचा लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही नंदिता दास यांचे आहे. तर प्रोड्यूसर आय स्टुडिओ आणि वायकॉम 18  मोशन पिक्चरचे आहे.  

 

हे ही वाचा- 

Pataakha Trailer – दोन बहिणींची कहानी ज्या एकमेकींचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहत नाहीत

 

Loading...

Pataakha Trailer – दोन बहिणींची कहानी ज्या एकमेकींचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहत नाहीत

Previous article

बॉलीवुड सिनेमातील असे काही डायलॉग्स, जे वाचून तुमच्यातील देशभक्ती जागृत होईल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *