Royal Entertainmentटॉप पोस्ट

Manmarziyaan Trailer : बोल्ड, क्रेजी, काॅमप्लिकेटेड ; पण इमोशनल ‘मनमर्जिया’

0

अभिषेक बच्चनची कमबैक फिल्म असणाऱ्या ‘मनमर्जिया’चा ट्रेलर आला आहे. अभिषेक बच्चन तब्बल दोन वर्षांनी  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या फिल्ममध्ये अभिषेक बच्चन बरोबरच, तापसी पन्नू आणि विकी कौशल देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. अभिषेक राॅबी, तापसी रूबीच्या तर विकी कौशल विकीच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत.

Loading...

ट्रेलर विषयी सांगायचे तर, तापसी आणि विकी एकमेंकावर जिवापाड प्रेम करत असतात, पण विकी लग्नाची जबाबदारी उचलण्यास तयार नसतो. त्याच वेळेस परदेशातून अभिषेक लग्नासाठी भारतात येतो आणि तापसीला पसंत करतो. ट्रेलरच्या सुरूवातीला तापसी विकी बरोबर किसिंग सीनमध्ये दिसून येते, तर शेवटला अभिषेक बरोबर लग्न केल्याचे दिसून येते.

ही  नेहमी प्रमाणेचीच एक ट्रॅंगल लव्ह स्टोरी आहे. फक्त अनुराग कश्यपच्या नेहमीच्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट हटके असणार आहे हे निश्चित.

विकी कौशलने ‘राजी’ आणि ‘मसान’ सारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. तसेच संजूमधील त्याची भूमिका देखीला लोकांना आवडली होती.

तापसी पन्नूचा हा या वर्षीचा शेवटचा चित्रपट असणार आहे. काही दिवसापूर्वीच तिचा ‘मुल्क’ हा चित्रपट रिलिज झाला असून, प्रेक्षकांबरोबरच क्रिटिक्सने देखील या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. याशिवाय अभिषेक बच्चन तब्बल दोन वर्षांनी कमबैक करणार अाहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास असणार आहे. अभिषेक बच्चनचा शेवटचा चित्रपट 2016 ला आलेला ‘हाऊसफूल – 3’ होता.

या फिल्मला अनूराग कश्यपने डायरेक्ट केले असून, त्याची शेवटची फिल्म ‘मुक्काबाज’ ही होती. तसेच नेटफ्लिक्सवरील सिरिज ‘सेक्रेड गेम्स’लाही लोकांनी चांगली पंसती दिली होती. आनंद.एल.रॉय हे या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2018 ला रिलिज होणार आहे.

ट्रेलर – 

 

Loading...

अजब-गजब: या देशात आहे असे एक अनोखे घड्याळ जे दाखवते एकाच वेळी जगातील 148 शहरांची योग्य वेळ

Previous article

9 ऑगस्ट ‘क्रांति दिन’ भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील एक लक्षात ठेवावा असा दिवस

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *