Royal politicsटॉप पोस्ट

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या घरात एका व्यक्तीने केला घुसण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांना संशयिताला केलं ठार

0

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल काॅन्फरंसचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्या घरात एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तींवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

आज सकाळी जम्मू-काश्मिरमधील भठिंढी येथे ही घटना घडली. कारमध्ये बसलेल्या काही अज्ञात व्यक्तीने अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाचे गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी फारूख अब्दुल्ला घरी उपस्थित नव्हते.

Loading...

जम्मूचे एसएसपी विवेक गुप्ताने या घटनेविषयी सांगितले की, त्या व्यक्ती मेन गेट पार करत आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. तिथे ड्युटीवर असणाऱ्या आॅफिसर बरोबर भांडण देखील झाले. यामध्ये तो आॅफिसर जख्मी झाला. त्यानंतर ती व्यक्ती डाॅ. अब्दुल्ला यांच्या घरात घुसली. त्याने घरातील काही सामानांची तोडफोड केली. त्यानंतर त्याला मारण्यात आले.

या घटनेनंतर डाॅ. अब्दुल्ला यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आयजी जमवाल यांनी सांगितले की, पुंछमध्ये राहणाऱ्या मुरफस शाह नावाच्या व्यक्तीने डाॅ. अब्दुल्ला यांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे एसयुवी होती. तसेच त्याच्याकडे कोणतेच हत्यार नव्हते. पुढील चौकशी सुरू आहे.

घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, आदल्या दिवशी तो माझ्या बरोबरच होता. तो रोज जिम जात असे. आजही गेला होता. मला माहिती करून घ्यायचे आहे की, त्याला का मारले ? जेव्हा त्याने गेट पार केले तेव्हा सुरक्षा गार्ड कोठे होते? त्याला अटक का नाही करण्यात आले?

हे ही वाचा –  

तीन न्यायाधीशांच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक नवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर केला

तुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह? हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य

आधारकार्ड नंबर देऊन हॅक करण्याचे दिले होते आवाहन; हॅकर्सने केले 1-1 रुपये बँक खात्यात जमा

Mulk Movie Review In Marathi : हिंदू की मुस्लिम ? ते की आम्ही ? तापसी पन्नू आणि ऋष‍ि कपूर स्टारर ‘मुल्क’ सांगतोय हा देश कोणाचा?

बाहुबली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण थेटरमध्ये नाही तर येथे; जाणून घ्या

Loading...

तीन न्यायाधीशांच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक नवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर केला

Previous article

‘नोव्हेंबरच्या अखेर मराठा आरक्षण मिळेल, तो पर्यंत महाभरती स्थगित’- मुख्यमंत्री

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *