मुख्य बातम्या

Man Booker Prize 2018 :- 50 वा मॅन बुकर मिळवणाऱ्या एना बर्न्स ठरल्या पहिल्या नाॅर्थ आयरिश महिला

0

पुस्तकांच्या जगातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 2018 चा पुरस्कार ‘मिल्कमॅन’ या पुस्तकासाठी आयर्लंडची लेखिका एना बर्न्सला देण्यात आला आहे. एना बर्न्स या मॅन बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या उत्तर आयर्लंडच्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.

बेलफास्ट येथे जन्म झालेल्या  एना बर्न्स या 56 वर्षांच्या असून, मॅन बुकरच्या 49 वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 17 व्या महिला आहेत. 2013 नंतर पुरस्कार मिळवणाऱ्या एना बर्न्स या पहिला महिला आहेत.

Loading...

एना बर्न्स यांची मिल्कमॅन ही कांदबरी एका 18 वर्षांच्या युवतीवर आधारित आहे. जिचा एक वयस्कर पुरूष शारीरिक आणि मानसिक छळ करत असतो.

पुरस्कार देणाऱ्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या क्वाम एंथोनी एपिया पुस्तकाविषयी म्हणाल्या की, याआधी असे पुस्तक वाचले नाही. या पुस्तकात क्रुरता आणि यौन शोषणला एका वेगळ्या प्रकारे समोर आणले आहे.

एना बर्न्स यांचे हे तिसरे पुस्तक आहे. याआधी त्यांनी नो बोंस (2001) आणि लिटिल कंस्ट्रक्शंस (2007) ही दोन पुस्तके लिहिली आहेत. तसेच 2011 साली त्यांना विनिफ्रेड पुरस्कार देखील मिळाला आहे.

या पुरस्काराची राशी म्हणून बर्न्स यांना 50 हजार युरो ( जवळपास 42,44,087 रूपये) देण्यात येणार आहे.

या वर्षींची मॅन बुकर पुरस्कारासाठी नामांकन झालेली पुस्तके – 

एवरीथिंग अंडर – डेजी जाॅन्सन

द लाॅंग टेक – राॅबिन राॅबर्टसन

द मार्स रूम – रशेल कुशनेर

द ओवर स्टोरी –  रिचर्ड पावर्स

वाॅशिंगटन ब्लॅक – एसी एडुग्यान

मागील वर्षीची बुकर पुरस्कार ‘लिंकन इन द बार्डो’ या पुस्तकासाठी अमेरिकेचे लेखक जाॅर्ज साॅंड्रेस यांना देण्यात आला होता.

मॅन बुकर पुरस्कार हा 1969 पासून देण्यात येत आहे. हा पुरस्कार कोणत्याही देशाच्या इंग्रजीच्या लेखकांना दिला जातो, ज्यांचे पुस्तक युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झाले आहे.

 

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयावर धडक

Previous article

या कारणामुळे कन्हैया कुमारला होऊ शकते अटक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *