Royal Entertainmentमुख्य बातम्या

बाबो एवढी पोटगी ! घटस्फो टानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी

0

मलायका अरोरा आणि अरबाज खान हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जात होते. ते दोघे कधी घटस्फोट घेतील असे त्यांच्या चाहत्यांना देखील वाटले नव्हते. पण त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर आता ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
मलायका लवकरच अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे तर अरबाज जॉर्जिया या मॉडेलसोबत नात्यात आहे. अरबाज आणि मलायकाने घटस्फोटाचा निर्णय घेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.एवढेच नव्हे तर ते कधी घटस्फोट घेतील असा विचार त्यांच्या कुटुंबियांनी देखील केला नव्हता.
पण त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या दोघांच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिला होता. अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर कोर्टात काही काऊन्सिलिंग सेशन्सदेखील झाले होते. पण ते दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. घटस्फोटाच्यावेळी अरबाजने मलायकाला किती पोटगी दिली हे तुम्हाला माहीत आहे का?
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटाच्यावेळी मलायकाने अरबाजकडे केवळ १० कोटी रुपये मागितले होते. मलायका ही स्वतःच्या पायवर उभी असून तिने मनोरंजन क्षेत्रात तिचे चांगलेच नाव कमावले आहे. त्यामुळे तिने अरबाजकडे जास्त पैशांची मागणी केली नव्हती. तरीही अरबाजने पोटगी म्हणून तिला १५ कोटी रुपये दिले.
मलायका आणि अरबाजला एक मुलगा असून घटस्फोटानंतर त्याची कस्टडी मलायकाकडे आहे. त्यांचा मुलगा अरहानची कस्टडी मलायकाकडे असली तरी अरबाज त्याला कधीही भेटू शकतो अशी त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे. अरबाजसोबत घटस्फोटाबाबत मलायकाने कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
याविषयी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि अरबाज घटस्फोट घेतोय हे मी माझ्या घरातील लोकांना आणि मित्रमैत्रिणींना सांगितल्यावर त्यांना सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला होता. ते काही क्षणासाठी जागच्या जागी स्तब्ध उभे होते.
पण कालांतराने त्यांनी मला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, तू हा निर्णय घेतेस म्हणजे तू कणखर स्त्री आहेस. त्यांच्या या बोलण्यामुळे मला आधार मिळाला. त्या परिस्थितीत मला त्या आधाराची प्रचंड गरज होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post बाबो एवढी पोटगी ! घटस्फो टानंतर अरबाज खानने मलायका अरोराला दिली इतक्या कोटीची पोटगी appeared first on Home.

चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा

Previous article

करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.