मुख्य बातम्या

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

0

काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. या बदलानुसार, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे.
जेष्ठांच्या या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे. सुरजेवाला हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात.
या बरोबरच रणदीप सुरजेवाला यांची नियुक्ती कर्नाटकच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त के. सी. वेणुगोपाळ यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :

गुलाब नबी यांना पक्षातून ‘आझाद’ करून टाका ; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले ! InShorts Marathi.

मुंबईच्या वाटेला वाद हे पाचवीलाच पुजलेले आहेत – शिवसेना

Previous article

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.