Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

माजलगाव मतदार संघातून भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार ?

0

टीम महाराष्ट्र देशा/शिरीषकुमार रामदासी – लोकसभेबरोबरच महाराष्ट्र विधान सभेचही वादळ तापतं आहे अशात जर ते बीड जिल्ह्यात अधिक तीव्र नसेल तरच नवलं.बीड जिल्ह्यात सहा विधानसभा आहेत यातील बीड वगळता पाचही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. माजलगाव-धारुर-वडवणीत राष्ट्रवादी कडुन माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच नावं आघाडीवर असलं तरी,लोकसभेचा अनुभव लक्षात घेता पक्ष त्यांना लोकसभा देणार कि विधानसभा यांबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. सोळंकेचं आज पर्यंत राजकारण हे वैरभावाच नसले तरीही,त्यांनी नेहमीच उसाच राजकारण करत आपला राजकिय स्वार्थ साधला आहे.पंधरा वर्ष आमदार व तीन वर्ष राज्यमंत्री राहिलेल्या सोळंकेंना एक ही महत्त्वकांक्षी योजना मतदार संघात राबवता आली नाही,स्वतःच्या ताब्यात असलेल्या तेलगावच्या ‘सुंदर साखर कारखान्यांतील’ कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक दिवसांपासुन थकित आहेत.कारखान्यातील कर्मचारी,कार्यकर्ते यांचे मोठे जाऴे असले तरी गटबाजीच्या राजकारणाचा फटका त्यांना टाऴता आलेला नाही,जि.प निवडणुकित प्रचंड मोठं यश मिऴवुनही त्यांच्या तोंडाशी आलेला अध्यक्ष पदाचा घास मंत्री पंकजा मुंडे व आ.सुरेश धसांनी हिरावुन घेत त्यांना आस्मान दाखवले आहे.

तिकडे सध्यातरी नेमक्या उमेदवारांचा शोध भाजप घेतयं 2014 मध्ये असलेली मोदी लाट व स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या सहानुभुतीवर निवडुन आलेले आ.आर.टी.देशमुख निष्प्रभ ठरले आहेत अशी चर्चा सामान्यांत आहे.याचाच प्रत्यय गतवर्षी झालेल्या जि.प.निवडणुकित आला मतदार संघातील 11 पैकि केवळ 2 जागी भाजपला विजय मिळवता आला विशेष म्हणजे आमदार स्वतःच्या मुलाला ही निवडुन आणु शकले नाहीत.

Loading...

माजलगाव नगर परिषदेत स्थानिक आघाडीशी केलेल्या युतीमुळेच भाजप सध्या सत्तेत आहे.धारुरात न.प भाजप कडे असली तरी यात आ.देशमुखांचे विशेष श्रेय नाही,वडवणी नगर पंचायत ही भाजपकडे असुन त्यात बाबरी मुंडें व माजी आमदार केशव आंधळे यांचेच ते खरे श्रेय आहे.मतदार संघातील समस्या,योजनांची प्रभावीपणे न झालेली अंमलबजावणी यांचा त्यांना फटका बसत असुन,लोकसंपर्काचाही प्रचंड अभाव आहे.प्रकाश सोळंकें विरोधात असलेली नाराजी व त्यांच्या कार्यकर्त्यांतील असलेली गटबाजी यांमुळे आ.देशमुखांना ग्रा.पं.निवडणुकित फायदा झाला पण,तालुक्याचे नेतृत्व ‘मास लिडर’ म्हणुन ते स्वतःला सिद्ध करु शकले नाहीत.आज पर्यंत लाभलेला सर्वात मितभाषी,सर्वांना आदर देणारा आमदार व मुंडे घराण्याचे विश्वासु हिच काय ती त्यांची जमेची बाजु आहे.

दुसरीकडे छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमांतुन प्रकाश सोळंकेंचे साखरेचं राजकारणाला छेद देणारे मोहन जगताप ही बाशिंग बांधुन तयार आहेत.आधि राष्ट्रवादीत असलेले मोहन जगताप सध्या भाजप शी जवळ साधत असले तरी मतदार संघात त्यांनी ‘मोहन जगताप मित्र मंडळाच्या’ माध्यमांतुन सवता सुभा उभारला आहे.माजलगांव तालुक्यात त्यांचा संपर्क दांडगा असला तरी धारुर-वडवणी तील डोंगर पट्टा त्यांना स्विकारेल कि नाही यात शंका आहे.आमदार देशमुखांप्रमाणे जि.प.निवडणुकित मोहन जगताप ही सपशेल अपयशी ठरले होते.त्यांचा प्रभाव असलेल्या तालखेड टाकरवन गटात त्यांच्या कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.मोहन जगताप आमदारकिचा निर्धार करत असले तरी त्यांचा पक्ष कोणता याची नेमकी हमी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही देत नाहीये.जगताप भाजप कडुन लढतील असा अंदाज सध्या बांधला जात असला तरी जर राष्ट्रवादीने प्रकाश सोळंकेंना लोकसभा दिली तर मात्र,मोहन जगताप राष्ट्रवादीे ची उमेदवारी मागु शकतात.एवढ्यावरही पक्षाची उमेदवारी मिळालीच नाही तर ते बंडखोरीची परंपरा कायम राखत निवडणुक लढवतील अशीही चर्चा आहे.

आ.देशमुखांबाबत असलेली नाराजी,मोहन जगतापांची अनुभव कमतरता व डोंगर पट्टात नसलेला संपर्क यांमुळे भाजप रमेश आडसकरांना येथे अजमावु शकते. अंबा साखर चे चेअरमन रमेश आडसकर हे हाबाडा फेम माजी आमदार कै.बाबुराव आडसकरांचे पुत्र आहेत.बीडजिल्ह्यातील आंबाजोगाई -केज-धारुर-वडवणी या तालुक्यातील त्यांचा दांडगा संपर्क आहे.शिक्षण संस्था,अंबा साखर,स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रा.पं.सेवा सोसायट्या यांच मोठं जाऴ ही आडसकरांची ताकद आहे.पुर्वी राष्ट्रवादीत असलेल्या आडसकरांनी 2009 मध्ये स्व.गोपिनाथराव मुंडें विरोधात लोकसभा लढवली होती त्यात त्यांचा प्रचंड मोठा पराभव झाला होता.आता ते भाजपवासी झाले आहेत.जिल्हा परिषदेचं सभापतीपद,उपाध्यक्ष पद यांचा त्यांना अनुभव आहे.शिवाय धारुर व वडवणी तालुक्यात त्यांचा थेट संपर्क असुन ते एक ‘सक्षम’ नेतृत्व आहेत.नाही म्हणायला जि.प.निवडणुकित त्यांचा ही डबल पराभव झाला आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणें त्यांच्या पुतन्याचा तर सोनावणेंच्या पत्निनी आडकरांच्या ‘सौं’ चा पराभव केला होता.जय पराजय हे नेहंमीचेच असले तरी आडसकर हे जिल्ह्यातील हेवीवेट नेते आहेत.

वडवणीतुन बबारीमुंडे-केशव आंधळे,धारुरातुन डाँ.स्वरुपसिंह हजारी-महादेव बडे,तर माजलगावांतुन डाँ.आनंदगावकर हे त्यांच्या आडसकारांचा आग्रह धरु शकतात. धारुरमधिल त्यांचा प्रभाव वडवणीत असलेला जनसंपर्क व माजलगावात असलेला नात्यांचा गोतावळा यांमुळे ते सध्या प्रबळ दावेदार आहेत.

Loading...

माढ्यातुन राष्ट्रवादीचा मीच ऊमेदवार असणार – आ. शिंदे

Previous article

काल आईचं तर आज वडिलांचं निधन,परदेशी कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.