Royal Entertainmentमुख्य बातम्या

महेश मांजरेकर रंगवणार मराठी बिग बॉसचे तिसरे युद्ध

0

मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि तो शो आहे आपला मराठी “बिग बॉस”. पहिल्या दोन पर्वांच्या घवघवीत यशानंतर आता बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 
पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिगबॉसच्या घराचं दार. पाहा #BiggBossMarathi लवकरच #ColorsMarathi वर.
A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on Aug 31, 2020 at 9:09am PDT

नुकतंच ‘बिग बॉस 3′ चा टिझर कलर्स मराठी चॅनलच्या ऑफिशल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच, या टिझर खाली “पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिगबॉसच्या घराचं दार’ असं कॅप्शन सुद्धा देण्यात आलं आहे.
त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, यंदाची थीम काय असेल, काय नवीन पाहायला मिळणार अशा अनेक प्रश्नांबाबत रसिकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.
The post महेश मांजरेकर रंगवणार मराठी बिग बॉसचे तिसरे युद्ध appeared first on Dainik Prabhat.

इंस्टाग्रामला मंदाना करीमीचा “बाय बाय’

Previous article

विरुष्काला रणवीर सिंहच्या खास शुभेच्छा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.