Royal Entertainmentमुख्य बातम्या

परवीन बाबीपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, महेश भट्ट राहिलेत वादाच्या भोवऱ्यात…

0

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाल्यानंतर महेश यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. हे काही पहिलंच प्रकरण नाही ज्यात महेश भट्टांचं नाव पुढे आलं.
कंगना रणौतनेही याआधी भट्ट यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनीही सुशांत प्रकरणात महेश भट्ट यांची चौकशी केली होती आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. महेश भट्ट आणि त्यांच्या आयुष्यातील कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल जाणून घेऊ…
परवीन बाबीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर- ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी या सिनेमांसोबत त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिल्या होत्या. महेश भट्ट आणि परवीन बाबी एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते.
त्यावेळी महेश भट्ट यांचं लग्न झालं होतं आणि एका लहान मुलीचे ते वडीलही होते. असं असतानाही ते परवीन यांच्यासोबत नात्यात होते. परवीन बाबी यांनानंतर मानसिक आजाराने ग्रासलं आणि त्यांचं आणि महेश भट्ट यांचं नातं संपुष्टात आलं.
पूजा भट्टसोबतचा किसिंग फोटो– मोठी मुलगी पूजा भट्टसोबत एका मासिकासाठी महेश भट्ट यांनी फोटोशूट केलं होतं. मासिकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या या चित्रात महेश भट्ट त्यांची मुलगी पूजाला किस करताना दिसत होते. या फोटोने तेव्हा मोठा वादंग निर्माण केला होता. तसेच पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली होती.
नशेच्या आहारी गेलेले महेश भट्ट- स्वत: महेश भट्ट यांनी कबूल केलं आहे की त्यांनी जीवनात खूप न शा केली होती. दिवस- रात्र ते दा रू च्या न शेत असायचे. पण लहान मुलगी शाहीन जन्मल्यानंतर त्यांनी एका रात्रीत दारू सोडली.
कंगनाने केले चप्पल फेकण्याचा आरोप– कंगना रणौतने महेश भट्ट यांच्या प्रॉडक्शनच्या ‘गँगस्टर’ सिनेमाद्वारे पदार्पण केलं होतं. अलीकडेच, कंगना आणि तिच्या बहिणीने सांगितले की २००६ मध्ये आलेल्या ‘वो लम्हे’ सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान भट्ट यांनी कंगनाशी गैरवर्तन केले होते. रागात महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पलही फेकली होती.
रिया चक्रवर्तीसोबतच्या इंटिमेट फोटोंमुळे झाले ट्रोल- महेश भट्ट यांच्या ७० व्या वाढदिवशी रिया चक्रवर्तीने भट्ट यांच्यासोबतचे इंटिमेट फोटो शेअर केले होते. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर महेश भट्ट यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
सुशांतच्या मृत्यूनंतर शेअर केला सांगाड्याचा फोटो– सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर महेश भट्ट यांनी सोशल मीडियावर सांगाड्याचा फोटो शेअर केला. महेश भट्ट यांनी या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ‘म र णा र माणूस विचित्र गोष्टींबद्दल विचार करत असतो आणि म्हणूनच आम्ही सर्व येथे आहोत, आपण सर्वजण म र णा रे लोक आहोत का?’ हा प्रसिद्ध कोट टेड विल्यम्सचा होता. पण लोकांना हा कोट अत्यंत असंवेदनशील वाटल्यामुळे महेश भट्टांवर टीका केली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post परवीन बाबीपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, महेश भट्ट राहिलेत वादाच्या भोवऱ्यात… appeared first on Home.

सैफच्या ‘या’ सवयीला वैतागली करिना, एका मुलाखतीत केला होता खुलासा….

Previous article

एके काळी मित्रांकडून मागून जेवण करायचा हा कलाकार, पण आज आहे मोठा सुपरस्टार, जाणून घ्या संघर्षाची कहाणी…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.