Royal politicsटॉप पोस्ट

मराठी माध्यमाच्या 6 वी च्या पुस्तकात गुजरातीचे धडे? महाराष्ट्र सरकारचा गुजराती कारभार

0

तुमच्या मुलाच्या पुस्तकात आता मराठी ऐवजी गुजराती भाषेत धडे दिसले तर तुम्ही काय कराल? तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण असाच प्रकार महाराष्ट्रात खरोखर घडला आहे.  महाराष्ट्र राज्यातील मराठी माध्यमाच्या  इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आला असल्याचे आज समोर आले.

6th std geography book

6th std geography book

Loading...

आधीच महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा विनोद झाला असताना आता हा मोठा विनोद खूपच भयानक आहे. आज विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून मराठी भाषा समितीचा पहिलाच अहवाल सादर करण्यात येणार होता. पण त्याआधीच मराठी भाषेचे तीन तेरा वाजले. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमाच्या सहावी इयत्तेच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहाच्या समोर आणून दिला.

6th std geography book

6th std geography book

गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरु आहे, असा आरोप आमदारांनी केला

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर – 

या मराठीच्या पुस्तकात 6 पाने गुजराती भाषेत छापण्यात आली आहे. पान क्रमांक 39 ते 45 या पानांवर गुजराती भाषेत मजकूर छापण्यात आला आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या मार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेत मराठी माध्यमाच्या 7 वीच्या विद्यार्थ्यांना  हीच पुस्तकं  देण्यात आली होती.

6th std geography book

6th std geography book

या पुस्तकांची छपाई अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी येथे करण्यात आली असल्याचा आरोप करीत, सहावी इयत्तेतील भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचे तटकरे यांनी विधान परिषदेत निदर्शनास आणून दिले.

तटकरे यांनी हा मुद्दा निदर्शनास आणून  दिल्यावर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले होते. हा गदारोळ केल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.  तर सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारकडे या घटनेबाबत खुलासा मागवला आहे आणि लवकरात लवकर दुरूस्ती करावी असे संगितले आहे.

Loading...

Oops! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काॅंग्रेसकडून झाली मोठी चूक

Previous article

पाकिस्तानात पोहचताच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक, राजकारणाला नवे वळण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *