Royal politicsटॉप पोस्ट

आता तुम्ही बिनधास्त मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ शकतात, राज्य सरकारची घोषणा

0

मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ‘मल्टिप्लेक्समध्ये विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि शीतपेय याच्या किंमती सिनेमाच्या तिकीटाच्या किंमतीपेक्षा अधिक असतात’ असे म्हणत थेटर मालकांना न्यायालयाने फटकारले होते. त्या नंतर मनसेकडून थेटरच्या व्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली होती. आता बऱ्याच विरोधानंतर महाराष्ट्र सरकारने बाहेरील खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेता येतील असे स्पष्ट केले आहे.

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ नेण्याला कोणीही अडवू शकत नाही, आणि तसे केल्यास राज्यसरकारकडून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एकच वस्तूची किंमत 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी ठेवता येणार नाही. तर एमआरपी नुसारच ठेवावी लागेल. 

Loading...

मल्टिप्लेक्स, फूडमॉल या सारख्या ठिकाणी बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येते यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर सतत आरोप करण्यात येत होते.

तसेच बाहेरील पदार्थाचे दर आणि मल्टिप्लेक्समध्ये विक्री करण्यात येणाऱ्या पदार्थाचे दर ह्या दरातील अंतर हे खूप जास्त असून, हे पदार्थ दुप्पट, तिप्पट भावाने ग्राहकांना विकले जातात. फक्त पदार्थ नाही तर पाण्याच्या बाटल्या सुद्धा एमआरपी पेक्षा जास्त किंमतीने विकल्या जातात.

विधानसभेत या संबंधित कायदा करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यामुळे 6 आठवड्याच्या आता या संबंधीचे धोरण ठरवणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संगितले.

तसेच 1 ऑगस्ट पासून केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या कायद्यानुसार एकाच वस्तूची वेगवेगळी एमआरपी राहणार नसल्याचे राज्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. जुना ज्यादा दराचा एमआरपी असलेला मालाची पूर्णता विक्री व्हावी म्हणून सरकार कडून 1 ऑगस्ट पर्यंतची थेटर मालकांना मुभा देण्यात आली आहे.

परंतू त्या नंतर मात्र पाणी बाटल्या आणि खाद्य पदार्थ यावर नोंदवण्यात आलेल्या एमआरपी किंमतीनुसार विक्री करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.

Loading...

Ayodhya Case : 20 जुलैपासून राम मंदिर- बाबरी मस्जिद विवादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Previous article

Oops! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काॅंग्रेसकडून झाली मोठी चूक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *