Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; वाचा कुणाला मिळणार डच्चू अन् कुणाचा होणार समावेश?

0

टीम महाराष्ट्र देशा- राज्य मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल करण्यात येणार आहे. काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं कळतंय.राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाल्या असून ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना परत मंत्री केले जाईल का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या मंत्र्यांना दिला जाऊ शकतो डच्चू

Loading...

फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचं बोलले जात आहे.

या नेते मंडळींची लागू शकते मंत्रीपदी वर्णी

विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

Loading...

उदगिरात प्राध्यापकांचे आंदोलन, विद्यार्थ्यांनी दिला पाठिंबा

Previous article

अगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच

Next article

You may also like

Comments

Comments are closed.