Royal EntertainmentRoyal politicsट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

हा तर नानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ; गृहराज्यमंत्री नानांच्या बचावात

0

टीम महाराष्ट्र देशा : ‘नाना पाटेकर यांना अनेक वर्षांपासून मी ओळखतो. दुष्काळग्रस्त शेतकरी व आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी त्यांनी केलेलं काम मोठं आहे. चित्रपटांपेक्षा त्यांच्या समाजकार्यामुळं ते जास्त प्रसिद्ध आहेत. या प्रकरणामुळं नानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून असे आरोप करण्याआधी विचार करायला हवा’ केला असं तनुश्री दत्ता व नाना पाटेकर यांच्या प्रकरणात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटल आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास तिनं थेट एफआयआर दाखल करावा असंही केसरकरांनी म्हटलं आहे.

‘दहा वर्षांपूर्वी एका आयटम साँगचं चित्रीकरण सुरू असताना नानांनी तनुश्रीशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिनं एका मुलाखतीत केला होता. तनुश्रीकडं काही ठोस पुरावे असल्यास तिनं ते सादर करावेत, एफआयआर दाखल करावी असं केल्यास चौकशीचे आदेश दिले जातील. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. नाना दोषी असतील तर ,त्यांना माफ केलं जाणार नाही’, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. मात्र तनुश्री कायद्याचा आधार न घेता मीडियामध्ये बेताल वक्तव्यं करत आहे, असं म्हणत तनुश्रीच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Loading...

सहकार क्षेत्रात मनसेची दमदार एन्ट्री तर शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही

Previous article

इधंन दरवाढीचा फटका आता एस टी प्रवाशांना ; तब्बल १८ टक्के भाव वाढीचा प्रस्ताव

Next article

You may also like

Comments

Comments are closed.