Royal politicsटॉप पोस्ट

अफवांमुळे 5 जणांची हत्या, 23 जणांना अटक

0

महाराष्ट्र  (धुळे):- 

चेन्नई आणि आसाममध्ये अफवा पसरल्यामुळे लोकांकडून झालेल्या मारहाणीत निरापराध लोकांच्या हत्या झाल्याची प्रकरणे ताजी आहेत. असे असताना आता महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात 5 जणांचा मारहाणीत जीव गेल्याप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या देशभरात जमावाकडून मारहाण केल्यामुळे जीव गेलेल्यांची संख्या मोठी असताना आता महाराष्ट्रात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...

कृपया कोणत्याही अफवाणा बळी पडू नका आणि सत्यता तपासल्याशिवाय मोबाइल वर येणारे संदेश फॉरवर्ड करू नका.

नक्की घटना काय घडली-

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात रविवारी आठवडी बाजार भरला होता. या बाजाराच्या परिसरातच काही लोक एसटीतून उतरले. त्यावेळी, त्यातील एका ने बाजूला असलेल्या एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. हे पाहणार्‍या गावातल्या काही लोकांचा ती लहान मुले पळवणारी टोली असल्याचा समज झाला. काही वेळातच ही अफवा बाजाराच्या आसपास पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. आणि गोळा झालेल्या जमावाकडून या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल झाल्यामुळे मारहाणीची ही घटना समोर आली. या व्हिडिओ मध्ये दिसते की, पहिल्यांदा लोकांनी त्यांना चपलेने मारहाण केली. काही तरुणांनी त्यांना राईनपाडा येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात बंदिस्त करून काठ्यांनी जबर मारहाण केली. तसेच काही अल्पवयीन मुले देखील लाथाबुक्यांनी मारत आणि शर्ट ओढत होती. मारहाण होणार्‍यांमधील एक जण हात जोडून आपल्याला मारू नये याची विनंती करीत आहे. व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती त्यातील एकाला मी तुला पुन्हा मारेल अशा प्रकारचे धमकी देताना दिसत आहे आणि बाकी चार जण रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले आहेत असे या व्हिडीओमधून समोर येत आहे.

धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संगितले की, यामधील १२ जण राईनपाडा गावातील स्थानिक रहिवाशी आहेत. यामध्ये काही किशोरवयीन मुलांचाही समावेश आहे.

यामधील अनेक आरोपी २० ते ३० वयोगटामधील आहेत. याप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली असून बाकी सहभागी लोकांचा पोलीस तपास करीत आहेत, आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींवर हत्या केल्याप्रकरणी (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे. आणि 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्रचे गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांनी आवाहन केले आहे की सोशल मीडिया वर पसरणार्‍या अफवांवर विश्वास ठेऊ नका.

चेन्नईमध्ये मुले पळवणारे असल्याच्या संशयावरून दोघांना मारहाण-

अशीच एक घटना चेन्नईमध्ये देखील घडली आहे, मुले पळवणारे असल्याच्या संशयावरून जमावाने 2 जणांना जबर मारहाण केली. यात ते जबर जखमी झाले आहेत. सत्यता तपासली असताना हे दोघे मजूर आहेत आणि चेन्नई मेट्रोचे काम करतात.

आसाम राज्यात देखील अफवेमुळे 2 जणांची हत्या-

आणखी अशीच एक घटना आसाम राज्यात घडली, गुवाहटी येथून आंगलोंग जिल्ह्यात आले होते. त्याच दिवशी मुले पळवली जात असल्याचा संदेश मोबाइलवर वायरल होत होता. हे लोक मुले पळवणारे असल्याच्या संशयावरून जमावाकडून त्यांची गाडी अडवण्यात येऊन त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला.

Loading...

पहा फोटो – मतांसाठी पाकिस्तानी नेत्याने केले हे कृत्य

Previous article

मेक्सिकोमध्ये ऐतिहासिक बदल; राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीच्या नेत्याचा विजय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *