Royal politicsटॉप पोस्ट

या कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला जायचे टाळले, जाणून घ्या कारण

0

दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पूजा करण्यासाठी पंढरपूरला विठ्ठालाच्या मंदिरात जातात. पण या वर्षी ती परंपरा खंडित झाली. त्याची काय कारण आहे हे जाणून घेताना काही गोष्टी समोर आल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  सोमवारी असलेल्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार होते. परंतु त्यांनी एक दिवसाआधीच  त्यांचा प्रवास रद्द करण्याची घोषणा केली. त्यांनी या वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाता आपल्या घरूनच म्हणजे ‘वर्षा’ बंगल्यावरूनच विठ्ठालाची पुजा केली.

Loading...

महाराष्ट्रात पुन्हा सुरू झालेल्या मराठा आंदोलनामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आणि धनगर समाज्याच्या आंदोलकानी धमकी दिली आहे की, ते मुख्यमंत्र्यांना या वर्षी पंढरपूरत येऊन विठ्ठालाची पुजा करून देणार नाहीत. कारण त्यांनी या समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. या धमक्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी आपला पंढरपूर दौरा रद्द केला. या आंदोलनात हिंसा होऊ शकते या कारणाने दौरा रद्द केला असल्याचे त्यांनी संगितले. यावर बोलताना ते म्हणाले की, “काही संघटना आणि लोक तर लोकांचे जीव संकटात टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

मुखमंत्री यावर पुढे म्हणाले की, पोलिसांनी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर आलेल्या मेसेज ची तपासणी केली, त्यावरून स्पष्ट होते की त्यांच्या पंढरपूरच्या दौर्‍यात आंदोलांकर्‍यांकडून दगड फेकी सारख्या घटना होऊ शकतात. मी अशा घटनांचा धिक्कार करतो. मला जरी जेड प्लस सुरक्षा असली तरी, पंढरपूर यात्रेतील 10 लाखाच्या वर भाविकांना ती सुरक्षा नाही. काही अनुचित प्रकारामुळे त्यांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. आणि ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्टी नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे की, मी यावर्षी पंढरपूरच्या पूजेला जाणार नाही. आणि दौरा रद्द केला.

यावरून अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर असणार्‍या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारत म्हणाले की, ‘विट्ठालालाच तुमचे दर्शन नको असेल

“राज्यात थापा मारणारे मुख्यमंत्री असून इतकं खोटे बोलणारे सरकार बघितलेच नव्हते. केंद्र व राज्यात या दोन्ही ठिकाणी आजपर्यंतचे सर्वात खोटे सरकार सत्तेत आहे.” अशी टीका त्यांनी केली. 

Loading...

अलवर मॉब लिंचिंग: सुप्रीम कोर्टात 20 आॅग्सटला होणार सुनावणी

Previous article

अलवर मॉब लिंचिंग : पोलिसांनी जखमी व्यक्तीला 6 किमी दूर हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्यास लावले 3 तास

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *