Royal politicsमुख्य बातम्या

मध्यप्रदेशात शिवसेना विधानसभेच्या रिंगणात; जाहीर केली उमेद्वारांची यादी

0
निवडणूक आयोगाने तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने मध्यप्रदेश राज्यातील विधानसभेची निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे.
28 नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी शिवसेनाही रिंगणात उतरली आहे. शिवसेनेने मध्यप्रदेशात निवडणूक लढणार्‍या आपल्या 21 उमेद्वारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे.

मध्यप्रदेशात एकूण 52 जिल्हे असून 230 मतदार संघ आहेत, तर राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेना उर्वरित उमेद्वारांची यादी 25 ऑक्टोबरला जाहीर करणार आहे. या आधी शिवसेनेने महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्येही निवडणूक लढवली होती.
शिवसेना मध्यपरदेशात रिंगणात उतरल्यामुळे सत्ताधारी भाजपला कितपत फटका बसेल याचे उत्तर ११ डिसेंबरला जाहीर होणार्‍या निकाल लागल्यावरच कळेल.
Loading...

मराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले ?

Previous article

#MeToo : नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा : आठवले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *