Royal politicsटॉप पोस्ट

या कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू

0

उत्तरप्रदेश लखनऊमध्ये शुक्रवारी रात्री एका पोलिस कॉंस्टेबलने अॅपल कंपनीच्या एरिया सेल्स मॅनेजरला गोळी मारल्याची घटना घडली.  यात एरिया सेल्स मॅनेजर विवेक तिवारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिस कॉंस्टेबलला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वतच्या बचावार्थ आपण गोळी चालवल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले आहे.

रात्री अॅपल मोबाइल लॉन्चिग करून घरी परतत असताना विवेक बरोबर ही घटना घडली. घरी येताना रस्त्यात पोलिसांकडून त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यावेळी पोलिस आणि विवेक मध्ये शाब्दिक चकमक झाली. प्रकरण इतका वाढले की त्यात पोलिस कॉंस्टेबल कडून विवेकवर गोळी झाडण्यात आली.

Loading...

विवेक तिवारीचा पोस्टमार्टम रिपोर्टसमोर आले आहे. यात विवेकच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्नीने पोलिसांकडे केली कडक कारवाईची मागणी-

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर विवेकच्या पत्नी कल्पना तिवारी म्हणल्या की, मुख्यमंत्र्यांनी स्वता घरी येऊन आमची भेट घ्यावी आणि पोलिसांकडून लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. जर त्यांनी काही चुकीच काम केला असेल तर त्यांना पकडायला हवे होती. गोळी मारण्याची अवशक्ता नव्हती. त्यांना मुद्दामुन गोळी मारण्यात आली असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी पोलिस कॉंस्टेबल प्रशांत चौधरी याने संगितले की, रात्री  2 च्या सुमारास रस्त्याच्या कडेला एक चार चाकी  गाडी थांबली होती, संशयाने गाडीत पाहाण्यासाठी जवळ गेलो. तेव्हा गाडी चालकाने गाडी सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कॉंस्टेबलने संगितले की, त्याने विवेकला गाडी थांबवण्याचा इशारा केला होता. परंतु विवेकने गाडीमधून त्याला मारण्याचा आणि आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी आपण त्याच्यावर गोळी झाडली.

विवेक बरोबर असलेल्या त्याच्या स्त्री सहकारी सनाने दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सनाने पोलिसांना संगितले की, सीएमएस गोमतीनगरजवळ रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली होती, त्यावेळी तिथे पोलिस आले आणि त्यांनी विवेकसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांपासून सुटण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. सनाने दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेकच्या गाडीच्या टक्कर पोलिसांच्या गाडीला-

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून कळते की पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात विवेकने एका पोलिसाच्या गाडीला धडक देखील दिली होती, त्यानंतर कॉंस्टेबल चौधरीने गोळी चालवली. गोळी गाडीच्या काचेतून आरपार गेली आणि विवेकला लागली.


फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला नक्की फाॅलो करा. तसेच व्हाॅट्सअॅपवर बातम्या मिळवण्यासाठी +91 9146424919 या नंबरवर ‘Join’ आणि ‘तुमचे नाव’ असा मेसेज नक्की करा.

Loading...

जगातला सर्वात महागडा शूज आहे विकायला, किंमत आहे तब्बल 1,23,26,05,000 रूपये

Previous article

इंधन भाववाढ :- कॉंग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींची थट्टा, महागाई नियंत्रणात असल्याचा पंतप्रधानांचा दावा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *