Royal politicsटॉप पोस्ट

मोदी सरकारविरोधात लोकसभेत विरोधकांकडून अविश्वासदर्शक ठराव; शेतकरी प्रश्न सोडवण्यात अपयशी?

0

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच लोकसभेत मोदी सरकारला अविश्वासदर्शक ठरावला सामोरे जावे लागले. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका जवळ असताना सरकारसाठी धक्का मानला जात आहे.

केंद्र सरकार अपयशी ठरले असून सरकारमुळे शेतकर्‍यांना अनेक वेळा आत्महतेचे पाऊल उचलावे लागते आहे. देशात रोज महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहे असा आरोप करीत विरोधकांनी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वासदर्शक प्रस्ताव सादर करण्यात करण्यात आला आहे. विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मंजूरी दिली आहे.

Loading...

गेल्या चार वर्षात मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. संसदेत यावेळी मोदी सरकारला अविश्वास दर्शक ठराव मांडून कोंडीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

तेलगू देसम पक्षाने सरकार शेतकरी आणि इतर पातळीवर अपयशी ठरत असल्याची टीका केली आणि मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वासदर्शक ठराव मांडला. या अविश्वासदर्शक ठरावाला कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील या ठरवला पाठिंबा दर्शवला आहे.

लोकसभेत सत्ताधार्‍यांविरोधात गेल्या 15 वर्षानंतर पहिल्यांदाचा अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आहे. या अविश्वासदर्शक ठरावाला तब्बल 50 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत शुक्रवारी चर्चा होणार आहे.

लोकसभेत असलेली जागांची आकडेवारी- 

भाजप- 273  

टीडीपी- 16  

कॉंग्रेस-  48 

एनसीपी- 7 

सीपीआय- 9 

Loading...

हरियाणातील या शाळेत शिकते फक्त एकच विद्यार्थीनी

Previous article

पूजा करणे हा महिलांचा संवैधानिक अधिकार आहे आणि यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *