मुख्य बातम्या

करून दाखवलंच ! आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया !!

0

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. अखेर पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन यशस्वी केले आहे. मनसेसैनिकांनी गनिमी कावा पद्धतीने लोकल स्टेशन गाठले. जेव्हा स्टेशनवर लोकल येऊन थांबणार होती, तेव्हाच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी स्टेशनवर धावत जाऊन लोकल पकडली. त्यानंतर पुढे लोकलने प्रवास पूर्ण केला.
यादरम्यान, संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकांना त्रास होतो. त्यासाठी आमची मागणी लोकल सेवा सगळ्यांना द्यावी अशी आहे. सरकार मात्र आम्हालाच नोटीस आणि पोलीस दंडुका दाखवत आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने चर्चा करावी’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मनसेचे सविनय कायदे भंग यशस्वी pic.twitter.com/FHXy7EwPcw
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 21, 2020

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
कोरोना लसीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल म्हणाले…
मोदींना सरकारी कार्यालयं कर्मचारीमुक्त करायची आहेत ; राहुल गांधींचा जोरदार घणाघात आरोप
केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींची तुलना केली हिटलरच्या मित्राशी, म्हणाले ….

मोठी बातमी : काँग्रेसच्या ‘या’ खासदाराचे कोरोनाने निधन,राहुल गांधींसह मोदींनी व्यक्त केले दुःख
शिवसेनेवर टीका करत कंगनाचा सोनिया गांधींना थेट सवाल

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. करून दाखवलंच ! आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया !! InShorts Marathi.

‘जमिनीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतायत’

Previous article

पहाटे सरकार स्थापनेच्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असणार ; शिवसेनेचा धक्कादायक गौप्यस्फोट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.