तंत्रज्ञान

आता डिजीटल असिस्टंट व वाय-फाययुक्त स्मार्ट एलईडी लाईट !

0

यीलाईट या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतांना चार स्मार्ट एलईडी लाईट सादर केले असून यात गुगल असिस्टंट आणि अलेक्झासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

जगातील प्रत्येक उपकरण हे स्मार्ट होत असतांना आता घरातील विद्युत दिवेदेखील याच मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. खरं तर, फिलीप्स कंपनीने ह्यू या मालिकेत याच प्रकारातील विविध बल्ब आधीच लाँच केलेले आहेत. तथापि, या बल्बला अन्य उपकरणांशी कनेक्ट करण्यासाठी वाय-फायची सुविधा असणार्‍या हबची आवश्यकता असते. मात्र यीलाईट कंपनीच्या बल्बमध्ये वाय-फाय हे इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेले असल्यामुळे याला वेगळ्या हबची आवश्यकता नाही. अर्थात हबशिवाय हे मॉडेल अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येते. यातील दुसरे लक्षवेधी फिचर म्हणजे यामध्ये गुगल असिस्टंट आणि अमेझॉनचा अलेक्झा हे दोन्ही डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आलेले आहेत. यामुळे कुणीही या असिस्टंटच्या माध्यमातून व्हाईस कमांडच्या मदतीने हे बल्ब वापरू शकतो. कुणीही ध्वनी आज्ञावली वापरून बल्ब चालू-बंद करण्यासह याची तीव्रता कमी-जास्त करू शकतो. डिजीटल असिस्टंटची सुविधा असणारे हे भारतीय बाजारपेठेतील पहिले बल्ब आहेत.

Loading...

यीलाईट कंपनी ही शाओमीच्या मालकीची असून चीनमध्ये त्यांनी या प्रकारातील अनेक उत्पादने आधीच लाँच केलेली आहेत. या कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतांना चार उत्पादने सादर केली आहेत. यात दोन एलईडी बल्ब असून एक लाईट स्ट्रीप तर एक कँडेला लँप आहे. स्मार्ट लाईटमध्ये एक रंगीत तर दुसर्‍या पांढर्‍या रंगाचा प्रकाश प्रदान करणारा आहे. यीलाईट स्ट्रीप ही १० मीटर लांबी असणारी लाईटांची पट्टी आहे. तर कँडेला लाईट हा नावातच नमूद असल्यानुसार अतिशय स्टायलीश असा टेबल लँप असून तो हूबेहूब एखाद्या मेणबत्तीप्रमाणे दिसणारा आहे. हे सर्व मॉडेल्स अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येणार आहेत. यातील एलईडी लँपचे पांढरे आणि रंगीत हे मॉडेल अनुक्रमे २,४९९ आणि २,७९९ रूपयात मिळणार आहेत. यीलाईट स्ट्रीपचे मूल्य ३,९९९ रूपये असून कँडेला लँप ४,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहेत. हे सर्व मॉडेल्स ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येतील.

Loading...

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *