मुख्य बातम्या

पुण्यात लर्निंग लायसन्स काढताय ; जाणून घ्या कार्यालयाची नवी वेळ

0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील लर्निंग लायसन्स विभागाचे कामकाज सकाळी साडेसात वाजतापासून सुरू केले जाणार आहे. लायसन्सचा कोटा वाढवल्याने गर्दी होवू नये, यासाठी खबरदारी म्हणून कामाचे तास वाढविण्यात आले आहेत.
परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार आरटीओ कार्यालयाने लायसन्सचे वेटिंग कमी करण्यासाठी कोटा वाढवण्याची सूचना केली होती. त्यानुसार लर्निंग लायसन्सचा कोटा नुकताच वाढवण्यात आला आहे. त्यांनतर आरटीओ मध्ये काही प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा या वेळेत काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुधारित ऑनलाइन अपॉइंटमेंट कोटा ऑनलाइन संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
बदललेल्या वेळेनुसार दररोज प्रत्येकी दीड तासांचे एकूण सर स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक स्लॉटमध्ये १०० उमेदवार याप्रमाणे प्रतिदिन ७०० उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा नागपुरात आणा ; शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध….
मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक !
कोरोनाचा त्रास वाढल्याने राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात दाखल !
राजू शेट्टी यांचा बारामतीत राज्य सरकारविरोधात एल्गार, मंत्री आला की दूधानेच आंघोळ घालणार

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यात लर्निंग लायसन्स काढताय ; जाणून घ्या कार्यालयाची नवी वेळ InShorts Marathi.

मोठी बातमी : ABCD सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला ड्रग्सप्रकरणात अटक !

Previous article

….मगच पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घ्या ; अजित दादांची प्रशासनाला सूचना

Next article

You may also like

Comments

Comments are closed.