Royal politicsटॉप पोस्ट

Fake News Alert : मोदी सरकार खरचं देत आहे का सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत मुलींना 10 हजाराचा चेक ?

0

सोशल मीडियाचा जमाना असताना कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आणि त्यातून कोण कसे पैसे कमवेल ते तर सांगणंच अवघड झाल आहे.  ‘व्हाट्स एप’वर सध्या एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धि योजना असे या मेसेजमध्ये लिहिले आहे आणि या योजने अंतर्गत प्रधानमंत्रींकडून 1 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलींना निशुल्क 10 हजार रुपयाचा चेक देण्यात येईल असे या मेसेजमध्ये देण्यात आले आहे. परंतू हा मेसेज पूर्णता फेक आहे.

या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे या लिंकवर क्लिक केल्यावर ही वेबसाइट ओपन होते. ही लिंक ओपन केल्यावर वेबसाइटमध्ये सर्वात वर ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या सरकारच्या योजनेचा लोगो दिसतो, वर वेबसाइटच्या URL मध्ये gov. in असे लिहिले आहे आणि लोक यालाच बळी पडतात. परंतू रोज येणार्‍या हजारो फेक मेसेज पैकी हा एक मेसेज आहे.

sukanya yojana fake news
Loading...

sukanya yojana fake news

लोगो पाहून लोक खाली दिलेली माहिती भरण्यासाठी नक्की सरसावतात. लिंक ओपन केल्यावर एक फॉर्म ओपन होतो. त्यात क्रमाने मुलीचे नाव, अर्ज करणार्‍याचे नाव, वय, राज्य ही माहिती भरण्यासाठी संगितले आहे. या फॉर्मच्या वर खाली दोन्हीकडे जाहिराती दिसतात.

यात आपले नाव टाकून माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला संगितले जाते की तुम्ही हा मेसेज तुमच्या 10 ग्रुप मध्ये अथवा मित्रांना व्हाट्स अॅप वर सेंड करा मग तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल असे असल्याने अनेकांनी हा मेसेज सगळ्या ग्रुपवर सेंड केला. 

sukanya yojana fake news

sukanya yojana fake news

त्यात ना कोणताही ईमेल अॅड्रेस, ना फोन नंबर, ना की तुमचं घरचा पत्ता मागितला आहे.. मग जर हा फॉर्म खरा असेल तर मग याची नोंदणी नक्की होते कुठे ? आणि तुमच्यापर्यंत या योजनेचा लाभ नक्की पोहचणार कसा ?  फक्त तुमच्या नावावर, की तुम्ही कोणत्या राज्यात राहतात या माहितीवर तुमच्या पर्यंत हा ’10 हजार’चा चेक पोहचणार आहे ?  परंतू कोणताही विचार न करता त्याची सत्यता न तपासता हा मेसेज सध्या जोमाने व्हाट्स अॅप वर व्हायरल होत आहे.

या वेबसाइट च्या खाली about us मध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आणि प्रायवसी पॉलिसीमध्ये पेज ओपन झाल्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो दिसतो आणि त्या शेजारी ‘बेटी बचओ, बेटी पढाओ’चा लोगो आणि एवढाच नाही तर या मध्ये असे देखील लिहिण्यात आले आहे की, या वेबसाइटवर वापरण्यात आलेला लोगो हा google वरून घेण्यात आला आहे. 

sukanya samrudh yojana fake news

sukanya samrudh yojana fake news

फॉर्ममध्ये तुमच्याकडून माहिती भरून घेण्यात येते मग माहीत जाते कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मग प्रायवसी पॉलिसी पहा. यात स्पष्ट देण्यात आले आहे की, आम्ही तुमचं कोणताही डाटा सेव करीत नाही! कृपया डाटा बद्दल कोणतीही चिंता करू नका.

असे फेक मेसेज पैसे कामावण्यासाठी बनवण्यात आलेल्या असतात. जेव्हा असे मेसेज आपल्याला सोशल मीडियावर दिसतात तेव्हा ह्या लिंकवर क्लिक करा असे त्यावर लिहिलेले असते. यावर क्लिक केल्याने ती वेबसाइट ओपन होते. लाखो लोक या लिंकवर क्लिक करत असल्याने या वेबसाइटला जास्त यूजर्स मिळतात, आणि त्या वेबसाइटवर google च्या जाहिराती चालू होतात. त्यामुळे त्याचा फायदा त्या वेबसाइटच्या मालकाला होतो, त्या जाहिरातीचे त्यांना पैसे मिळतात. हा फसवण्याचा धंदा आहे. त्यामुळे अशा मेसेज पासून आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे.

काय आहे सुकन्या समृद्धि योजना ?

ही योजना मोदी सरकारकडून 4 डिसेंबर 2014 रोजी मुलींच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आई-वडिल मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 10 वर्षाच्या आत तिच्या नावे एसबीआय बॅंकेत  कमीत कमी 250 रूपये भरून खाते उघडू शकता. तसेच कोणत्याही पोस्ट आॅफिस आणि सरकारी बॅंकेत हे खाते उघडले जाते.

मुलीच्या 14 वर्षांपर्यंत त्यात  तुम्ही पैसे भरू शकता. त्यानंतर पैसे भरण्याची गरज नाही. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 50 टक्के रक्कम काढता येते. मुलीच्या 21 वर्षानंतर यातील रक्कम काढल्यास 100 टक्के रक्कम परत मिळते. या योजनेअंतर्गत महिन्याला या खात्यावर 8.40 टक्के व्याज दिले जाते. 

Loading...

पोलिसांनी गाडीची ओरिजनल कागदपत्रे मागितली तर त्यांना ही बातमी दाखवा

Previous article

कॅन्सरशी लढत असलेल्या सोनाली बेंद्रेने मुलाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली इमोशनल पोस्ट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *