Royal politicsटॉप पोस्ट

राज्यसभेत विरोधकांची दांडी गुल, उपसभापती निवडणुकीत एनडीएने मारली बाजी

0

एनडीएचे राज्यसभेचे खासदार हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार बी के हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव करत उपसभापती पदावर दावा ठोकला. या निवडणुकीत एकूण 222 खासदारांनी मतदान केले.  हरिवंश सिंह यांना 125 मते  मिळाली, तर बी के हरिप्रसाद 105 मते मिळाली. 9 ऑगस्ट ला राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणुका होतील असे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केले होते.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिवंश सिंह यांना त्यांच्या खुर्ची जवळ जाऊन अभिनंदन केलं. तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांचे  अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.  आज सकाळीच निवडणूक सुरू होण्याआधी  भाजपाच्या  वरिष्ठ नेत्यांनी  हरिवंश सिंह यांना 129 मते मिळतील, असे संगितले होते. आणि निकाल लगेपर्यंत एनडीए च्या हरिवंश सिंह यांना 122 मते मिळाली होती. भाजपला या निवडणुकीत 123 च्या आसपास मते मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु शेवटी भाजपला काही पक्षांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यसभेत उपसभापतीपदासाठी दोनवेळा मतदान घेण्यात आले. कारण पहिल्या वेळी मतदानात हरिवंश यांना 115 एवढी मते मिळाली होती.  असे सांगण्यात आले की  पहिल्या मतदानावेळी काही मतांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान घेण्यात आले. यात हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली.  बिजू जनता दल,  टीआरएस, अण्णा द्रमुक, या पक्षांनी हरिवंश यांना मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला उपसभापती पदावर पाणी सोडावे लागले.  बिजू जनता दलचे राज्यसभेत 9 खासदार आहेत.

कोण आहेत हरिवंश सिंह-

उपसभापती निवडणुकीसाठी एनडीए कडून जेडीयू चे हरिवंश सिंह यांना उमेदवार देण्यात आली होती. ते बर्‍याच काळापासून जनता दल यूनायटेड चे नेते राहले आहेत. हरिवंश हे बिहार मधील प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रामध्ये संपादक पदावर काम देखील केले आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी संगितले की हरिवंश यांचे पूर्ण नाव हरिवंश नारायण सिंह आहे. त्यांना जयप्रकाश नारायण यांच्या कार्य पासून नेहमी प्रेरणा मिळते, त्यामुळे त्यांनी आपले आडनाव वगळले असून ते हरिवंश नारायण लावतात.

हरिवंश नारायण सिंह याचे वय 62 वर्ष असून ते 2014 मध्ये पहिल्यांदा बिहारमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. राज्यसभेत निवडून गेल्यापासून त्यांची सभेतील हजेरी ही 89 % आहे. त्यांनी त्यांचे पोस्ट ग्रॅजुएशन अर्थशास्त्र या विषयात केले असून, पत्रकारितेचा डिप्लोमा देखील केला आहे.  

या आधी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना विरोधी पक्षांकडून उपसभापती पदाच्या उमेदवारीसाठी निवड करण्यात यावी अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर काल बी के हरीप्रसाद यांची उपसभापती पदाच्या उमेदवारी साठी यूपीए कडून आणि विरोधी पक्षांकडून निवड करण्यात आली.

राज्यसभेत एकूण 245 खासदार आहेत, यात ‘एनडीए’कडे 115 जागा असून त्यात सगळ्यात जास्त जागा भाजपकडे (73) आहेत. ‘यूपीए’कडे एकूण 113 खासदार आहेत. त्यात कॉंग्रेसकडे 50 खासदार आहेत. तर अन्य पक्षांकडे 17 खासदार आहेत. उपसभापतीच्या अटीटतटीच्या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी 122 हा जादुई आकडा मिळवणे गरजेचे होते.

Loading...

9 ऑगस्ट ‘क्रांति दिन’ भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील एक लक्षात ठेवावा असा दिवस

Previous article

हा खासदार संसदेत पोहचतो कधी राम, कधी नारद मुनी तर कधी हिटलर बनून; काय आहे कारण जाऊन घ्या

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *