Royal Entertainmentटॉप पोस्ट

Sui Dhaaga Trailer : बेरोजगारापासून रोजगारापर्यंत जाणार्‍या आयुष्याचा Unstoppable प्रवास

0

यशराज फिल्मचा नवा सिनेमा ‘सुई धागा मेड इन इंडिया’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे, यात वरूण धवन आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यशराजचा निर्मिती असलेला या सिनेमात वरुण (मोजी) तर अनुष्का (ममता) हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहे. या सिनेमात त्यांनी टिपिकल नवरा बायकोची भूमिका निभावली आहे.

झाजूलाल या त्यांच्या आजोबांपासून सुरू असलेला शिवणकामाचा पारंपरिक व्यवसाय हे पुढे नेण्याचा कसा प्रयत्न करतात आणि आपला व्यवसाय त्याच शिवण कामाच्या जोरावर सुई धागा या कंपनी पर्यंत पोहचवण्याचा कसा प्रयत्न करतात हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे.

Loading...

एक सामान्य माणूस त्याची जगण्याची धडपड, ठीक ठिकाणी सहन करावा लागणारा अपमान, बायकोकडून मिळणारी साथ, बेरोजगारकडून रोजगारकडे होणारा प्रवास, आणि अशक्यला शक्य करण्याची धमक अशी ही कथा आहे.

एका शिलाई मशीनवर स्वतची कंपनी टाकण्याचा आणि सुई धागा मेड इन इंडिया हा ब्रॅंड तयार करण्याचे  मोजी आणि ममता या जोडी स्वप्न खरच साकार होईल का आणि कस हे आता सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. पण ट्रेलरवरुन नक्की सिनेमा पाहायला जावा असा तरी ट्रेलर नक्कीच आहे.

दम लगा के हाइशा या गाजलेल्या सिनेमानंतर दिग्दर्शक शरत कटारिया सुई धागाचे दिग्दर्शन करत आहे. ट्रेलर पाहून तरी ही जोडी बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरणार असं दिसतय.

या सिनेमाचे निर्माते मनीष शर्मा आहे. महेश शर्मा आणि शरत कटारिया याच जोडीने दम लगा के हाइशा हा सिनेमा यशस्वी केला होता. आता हा बडी स्टारकास्ट वाला सिनेमा किती यशस्वी ठरतो हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल. या सिनेमाला अनू मलिक यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे लिरिक्स वरुण ग्रोवर याचे आहेत.  हा सिनेमा 28 सप्टेंबरला बॉक्सऑफिस वर येऊन धडकणार आहे. 

Loading...

‘राफेल विमान खरेदी प्रकरणात 41 हजार कोटीचा घोटाळा, महाराष्ट्र सरकार घोटाळ्यात सहभागी’

Previous article

दिल्लीमध्ये संविधान जाळणारे लोक कोण आहेत ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *