Royal politicsटॉप पोस्ट

Maharashtra : घातपाताचा कट रचल्याप्रकरणी राज्यात अटकसत्र सुरू, 20 गावठी बाॅम्ब जप्त

0

घातपाताचा कट रचल्याप्रकरणी सध्या संपूर्ण राज्यात पोलिसांकडून अटकसत्र सुरु असून त्यात आतापर्यत एकूण १२ जणांना अटक करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, सातारा येथे ही कारवाई कऱण्यात आली. काल वैभव राऊत यांच्या दुकानातून आणि घरातून २० गावठी बॉम्ब, स्फोटक आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. राज्याच्या विविध ठिकाणी घातपात घडविण्याचा कट करण्यात येत होता, असे संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काल राम सेनेचे वैभव राऊत यांना नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आले तर पुण्यात देखील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  असे असले तरी राज्य दहशतवादविरोधी पथकाची अजून काही संशयितांचे अटक सत्र सुरु आहे. ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Loading...

एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की,  खबऱ्यांकडून मिळलेल्या माहिती आणि मोबाइल नंबर याच्या आधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघांवर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यावर ही कारवाई करण्यात आली.

 ‘साई दर्शन’ नाव असलेल्या या इमारतीच्या खालील दुकानात हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. तरुण, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते असा संशय आहे, कारण जप्त करण्यात बाॅम्ब कमी तीव्रतेचे होते. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी स्वत: टोळी करून घातपात घडून आणण्याची तयारी करीत होते की त्यांच्यामागे एखादी संघटना अथवा व्यक्ती आहे, या दृष्टीनेही तपास केला जात आहे ,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे.

बॉम्ब बनविण्याचे साहित्य, बाॅम्ब आणि स्फोटक बाळगणारे हे आरोपी दहशतवादी टोळीचे किंवा संघटनेचे असावेत, असा अंदाज पोलिसांना आहे. हे बॉम्ब का तयार केले, त्यासाठी लागणारे साहित्य कुठून उपलब्ध झाले, त्याचा वापर कुठे केला जाणार होता याची चौकशी केली जात आहे.

एटीएसने न्यायालयात हा संशय व्यक्त केला की, आरोपी मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते. न्यायालयानकडून तिघा आरोपीना 18 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर (पुणे), कॉम्रेड गोविंद पानसरे (कोल्हापूर) आणि गौरी लंकेश (कर्नाटक) यांच्या हत्येच्या संबंधी देखील त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा- 

पोलिसांनी गाडीची ओरिजनल कागदपत्रे मागितली तर त्यांना ही बातमी दाखवा

कॅन्सरशी लढत असलेल्या सोनाली बेंद्रेने मुलाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली इमोशनल पोस्ट

 

Loading...

कॅन्सरशी लढत असलेल्या सोनाली बेंद्रेने मुलाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली इमोशनल पोस्ट

Previous article

‘राफेल विमान खरेदी प्रकरणात 41 हजार कोटीचा घोटाळा, महाराष्ट्र सरकार घोटाळ्यात सहभागी’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *