महाराष्ट्रमुख्य बातम्याशैक्षणिक

माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जेऊरमध्ये होणार माजी प्राचार्य कै. मु. ना कदम यांचे भव्य स्मारक

0

करमाळा/गौरव मोरे- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भारत शैक्षणिक संकुलाचे माजी संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक होणार आहे.जेऊर मधील भारत हायस्कूलच्या प्रांगणात हे स्मारक होणार असून भारत हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

कै. मुरलीधर नागनाथ उर्फ मु.ना कदम सरांनी भारत शैक्षणिक संकुलात खूप मोठे योगदान दिलेले आहे. मु ना कदम सरांचा जन्म १९ मार्च १९२९ रोजी झाला.लहानपणी आई-वडीलांचे छत्र हरपले, स्वःताच्या बळावर त्यांनी पदवीचे शिक्षण सोलापूरात तर बी.टी चे शिक्षण पुणे येथे घेतले. त्यांनतर त्यांनी सोलापूरात लोणकर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली.१९५२ रोजी जेऊर सारख्या गावा मध्ये लोणकर प्रशालेची शाळा जेऊर मध्ये सुरू झाली आणि मुख्याध्यापक म्हणून कदम सर रुजू  झाले परंतु काही वर्षांनी ही शाळा बंद झाली. त्या काळातील शिक्षणाची गरज ओळखून कदम सरांनी भारत शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि दीर्घकाळ या हायस्कूलचे प्राचार्य ही होते.

Loading...

अनेक विद्यार्थी घडविले.त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा कायमस्वरूपी मित्र, हितचिंतक होत असे. हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मु.ना कदम सरांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मुलात काहीतरी दडलेले असतेच. त्यास हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याची, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधण्याची व त्याला प्रगतीची संधी देण्याची भूमिका त्यावेळी कदम सरांनी घेतली. कदम सरांनी ग्रामीण भागातील प्रज्ञावान, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेऊर येथे १९७२ मध्ये मोफत वसतिगृहयुक्त हायस्कूलची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच प्राचार्य ही होते. कदम सरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे.

हजारो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या कदम सरांनी त्यावेळी केलेल्या योगदानामुळे अनेक विद्यार्थी घडले.सरांचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी करत असून पंचक्रोशीतील विद्यार्थांना प्रेरणा मिळावी यासाठी  कै. मु. ना .कदम सर यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक भारत हायस्कूलच्या प्रांगणात येत्या जानेवारी मध्ये होणार असून माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला असून या स्मारकासाठी निधी देण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेने केलेला आहे.

Loading...

मोहिते-पाटलांचा होणार पत्ता कट?

Previous article

महादेव जानकरांनी दिली खा.उदयनराजे भोसले यांना ‘रासप’मध्ये येण्याची ऑफर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.