खेळमुख्य बातम्या

…म्हणून लसिथ मलिंगा घेतोय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

0

कोलोंबो। आजपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज(26 जूलै) आर प्रेमादासा स्टेडीयमवर सुरु असून या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना आहे.

या सामन्यानंतर मलिंगा वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. यावेळी निवृत्ती घेताना त्याने आनंदी असल्याचे म्हटले असून तो असेही म्हणाला की यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

Loading...

आजच्या सामन्याआधी बोलताना मलिंगा म्हणाला, ‘या वेळी निवृत्ती घेताना मला आनंद वाटत आहे. ही नवीन खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची आणि पुढील विश्वचषकासाठी तयारी करण्याची संधी आहे. आम्ही काही धक्के नक्कीच खाल्ले पण आमच्याकडे विश्वचषक जिंकण्याती क्षमता आहे.’

तसेच युवा खेळाडूंबद्दल मलिंगा म्हणाला, ‘युवा खेळाडूंना विश्वास ठेवण्याची गरज आहे की ते चांगली कामगिरी करु शकतात. त्यांनी समर्पित होण्याची गरज आहे आणि जेव्हा ते मैदानात जातील तेव्हा स्वत: साठी निर्णय घेऊ शकतील, अशा स्तरावर त्यांचा विकास व्हायला पाहिजे.’

अचूक यॉर्कर टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या मलिंगाने त्याच्या वनडे कारकिर्दीत अत्तापर्यंत 225 सामन्यात 29.02 च्या सरासरीने 335 विकेट्स घेतल्या आहेत.

तो श्रीलंकेचा वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. श्रीलंकेकडून त्याच्यापेक्षा केवळ मुथय्या मुरलीधरन(523) आणि चांमिंडा वास(399) यांनी अधिक वनडे विकेट्स घेतल्या आहेत.

Loading...

टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो ऐवजी आता दिसणार हे नाव

Previous article

नाच्या’चं काम सोडून लोकांच्या घरात घुसलेल्या पाण्याचं बघा. अजित पवारांनी या नेत्याला फटकारले !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ