Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘लक्ष्मी बॉम्ब’ आणखी अडचणीत, ‘या’ मुद्द्यावरून हिंदू सेनेने दिला इशारा

0

मुंबई – चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.
दरम्यान, प्रदर्शना पूर्वीच लक्ष्मी बॉम्ब चित्रपट अडचणींमध्ये सापडण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेळ्या कारणांमुळे हा चित्रपट ट्रोल होत असल्याचे दिसून येत आहे. हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

 

View this post on Instagram

 
Three’s not always a crowd! Team #LaxmmiBomb with the real Laxmi on sets of #TheKapilSharmaShow today! @kiaraaliaadvani @laxminarayan_tripathi @kapilsharma
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on Oct 18, 2020 at 5:26am PDT

राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करून चित्रपटात मार्फत देवीचा अपमान केला जात आहे. त्यामुळे आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही”. असा इशारा हिंदू सेनेने दिला आहे. या संदर्भातील एक पत्र हिंदू सेसेने प्रकाश जावडेकर यांना लिहलं आहे.

 

View this post on Instagram

 
Jahan kahi bhi hain, wahi ruk jaayyein aur taiyyaar ho jaayyein dekhne #LaxmmiBomb ka trailer, kyunki barasne aa rahi hai Laxmmi! #LaxmmiBombTrailer out now. #YeDiwaliLaxmmiBombWali! #FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex @kiaraaliaadvani @offl_lawrence @shabskofficial @tusshark89 @foxstarhindi @disneyplushotstarvip #CapeOfGoodFilms #ShabinaaEntertainment #TussharEntertainmentHouse @zeemusiccompany
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on Oct 9, 2020 at 12:01am PDT

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. सध्या सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा एक भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण असा चित्रपट असणार आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकरणार आहे.
 
The post ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणखी अडचणीत, ‘या’ मुद्द्यावरून हिंदू सेनेने दिला इशारा appeared first on Dainik Prabhat.

संजू बाबा झाला कॅन्सरमुक्त

Previous article

कोणत्याही कारणाने बायको नाराज झाली असेल तर आजमावून पहा या टिप्स…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.