Royal Entertainmentमुख्य बातम्या

ड्र ग्स प्रकरणात रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ मराठी अभिनेत्रीचा पती

0

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आज एक मोठं अपडेट समोर आलं आहे. एनसीबीची टीमने ड्र ग अँगलची तपासणी करण्यासाठी रिया चक्रवर्तीच्या घरी छा पा टाकला. या पथकात मुंबई पोलिसही होते.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं राजपूत याच्या मृ त्यूच्या तपासनं वेगळंच वळण घेतलं असून नार-कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून देखील या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांची नार-कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात येत आहे.
नार-कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून शुक्रवारी सकाळी रिया चक्रवर्तीच्या प्राइम रोज अपार्टमेन्ट आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छा पा टाकला.
विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे करत असल्यानं ड्र ग डिलचे धाबे दणाणले असल्याचं म्हटलं जात आहे. समीर वामखेडे हे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती असून यापूर्वी देखील त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी छा पे टाकले आहेत.
अनुराग कश्यप, विवेक ऑबेरॉय तसंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या घरी त्यांनी छा पे टाकले होते. समीर हे 2004 च्याबॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
2007 मध्ये क्रांती आणि समीर विवाहबंधनात अडकले होते. त्यांना दोन जुळ्या मुली असून क्रांतीनं सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांचे फोटो शेअर करणं टाळलं आहे. इतकंच नाही तर लग्न देखील तिनं गुपचूपचं केलं होतं.
क्रांतीनं फेसबुकवर स्टेटस अपडेट करून आपलं नाव बदलल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, माझे पती देशसेवेत असल्यानं फार मोठा गाजावाजा न करता साधेपणानं लग्न करायचा निर्णय आम्ही घेतला, असं क्रांतीनं स्पष्ट केलं होतं.
मी आणि माझा नवरा लग्नाआधीपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत आणि आयुष्यभर राहू. माझ्यातील वेडेपणा समजून घेणारा साथीदार मला हवा होता आणि समीर तसाच आहे. मी लग्नानंतरही सिनेसृष्टीत काम करत राहीन, असंही तिनं सांगितलं होतं.
दरम्यान, अ म ली पदार्थांच्या देवाण- घेवाणीमध्ये शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलचं नाव समोर आलं होतं. यानंतर नार-कोटिक्सच्या टीमनं दोघांच्या घरी छा पा टाकला. जवळपास तीन तास शौविकच्या घरी शोध मोहीम सुरू होती. याशिवाय एनसीबीनं शौविकला चौकशीसाठीचा समन्स पाठवला.
तर मिरांडाच्या घरी दोन तास चाललेल्या छा पे मा रीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. पुढील चौकशीसाठी सॅम्युअलला ऑफिसला घेऊन जाण्यात आलं. याआधी अटक करण्यात आलेले आ रो पी झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांच्याकडून शौविक आणि सॅम्युअलचं नाव समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी जवळपास 9.40 वाजता एनसीबी टीम रियाच्या घरी पोहोचली. त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांचे अधिकारीही उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या कर्मचाऱ्यांचे अनेक ड्र ग चॅट समोर आले. यानंतरच या प्रकरणात एनसीबी टीम अॅक्टीव्ह झाली.
अशाच माहितीसाठी आमचे पेज नक्की लाईक करा
The post ड्र ग्स प्रकरणात रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ मराठी अभिनेत्रीचा पती appeared first on Home.

एका पेक्षा जास्त लग्न करूनही आज एकाकी जीवन जगतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…

Previous article

विद्या बालनची बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बोल्ड सीन्स देण्यात तिचाही आहे हातखंडा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.