Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

कोराडीतील महालक्ष्मी मंदिराच्या अंदाजे 30 कोटी रुपयांच्या नव्या सहा कामांना शिखर समितीची मान्यता

0

नागपूरमधील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत अंदाजे 30 कोटी रुपयांच्या नव्या 6 कामांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, मुख्य सचिव डी. के. जैन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Loading...

तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमधील विविध विकास कामे सुरू आहेत. मुख्य मंदिर सभागृहाचे बांधकाम, आवार भिंत, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बस व वाहनतळ, भक्त निवास, व्यापारी संकुल, पर्यटक म्युझियम आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

नव्याने समाविष्ट महाद्वार बांधकाम (630.63 लाख), राम मंदिर सभागृह बांधकाम (899.78 लाख), हनुमान मंदिर सभागृह (623.48 लाख), उपहार गृह (53.89 लाख), इनडोअर गेम गृह (53.89 लाख) आणि नागपूर सावनेर रस्त्यापासून कोराडी महालक्ष्मी मंदीर पोचमार्ग (815.15 लाख) या कामांना आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Loading...

गोरगरीबांची एस.टी. महागणार, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

Previous article

मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल – मुख्यमंत्री

Next article

You may also like

Comments

Comments are closed.