मुख्य बातम्या

‘कोहिनूर’ हिरा कसा लागला इंग्रजांच्या हाती, उलगडले गूढ

0

असा हिरा ज्याची चर्चा सतत लोकांच्या मुखात असते. पण त्याबरोबर एक दु:ख देखील असते की आज तो हिरा भारताकडे नाही. अशा कोहिनूर हिर्‍याचे एक गूढ समोर आले आहे. भारताची शान असलेला कोहिनूर इंग्लंडच्या राणीच्या खजान्यात कसं काय गेला याचे गूढ खुद भारत सरकारकडून सांगण्यात आहे आहे.

भारताच्या त्या चकचकीत कोहिनूरला राजा दलीप सिंहने इंग्लंडच्या राणीला गिफ्ट म्हणून नाही तर नाईलाजाने दिला.

भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) दिलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तरात ही बाब उघड झाली. लुधियना मधल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने ही माहिती मागितली होती.

Loading...

परंतू कोहिनूर हिर्‍याबद्दल पुरातत्व विभागाचे आणि आणि भारत सरकारचे या बद्दलचे मत मात्र वेगवेगळे आहे. हा हिरा इंग्लंडमध्ये कसा गेला याबद्दल पुरातत्व विभाग आणि भारत सरकार यांनी दिलेली उत्तर देखील वेगळी आहेत.

सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या एक याचिकेला उत्तर देताना सरकारकडून सांगण्यात आले होते की, महाराज रणजीत सिंह यांचे वंशज राजा दलीप सिंह यांनी कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनीला गिफ्ट म्हणून देण्यात आला होता.

तर पुरातत्व विभागने माहिती अधिकारात संगितले की, कोहिनूर हिरा राजा दलीप सिंह ने नाईलाजाने इंग्लंडच्या राणीला दिला.

लुधियानातील माहिती अधिकार कार्यकर्ता रोहित सभरवाल यांनी कोहिनूर हिर्‍यासंबंधित माहिती माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यांना याची कल्पना नव्हती की ही माहिती सरकारच्या कोणत्या विभागाकडे मागायची, म्हणून त्यांनी पीएमओ कडे ही माहिती मागितली. पीएमओने ही माहिती पुरातत्व विभागाकडे पाठवली. 1 महिन्यानंतर आलेल्या माहिती अधिकारात ही बाब उघड झाली.

महाराज रणजीत सिंहचे वंशज राजा दलीप सिंहने 1849 ला इंग्लंडच्या राणीला कोहिनूर हिरा नाईलाजने सुपूर्त केला होता. राजा रणजीत सिंहला हा हिरा शहा शुजा उल मुल्क यांच्यांकडून मिळाला होता.

अशा प्रकारे कोहिनूर हिरा गेला इंग्लंडच्या हाती – 

  • कोहिनूरबद्दल संगितले जाते की, 13 व्या शतकात काकतीय वंशाच्या काळात हा हिरा गंटूर येथे शोधण्यात आला होता.
  • 14 व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतात स्वारी केल्यावर लुटीत हा हिरा मिळाला होता. या आधी या हिर्‍याचे नाव कोहिनूर नव्हते.
  • दिल्ली सलतनात नंतर मुघलांकडे गेली, त्यानंतर शहाजहाच्या मयूर सिंहासनमध्ये हा हिरा होता.
  • नादिरशहाने मुघल सलतनतवर हल्ला केल्यानंतर लुटलेल्या खजिन्यात हा हिरा नादिरशहाकडे गेला. नादिरशहाने त्याला कोहिनूर असे नाव दिले.
  • नादिरशहाच्या हत्येनंतर हा हिरा त्याचा सेनापती असलेल्या अहमद शहा दुराणीकडे गेला.
  • दुराणीने आपल्या शत्रूपासून आपले रक्षण व्हावे म्हणून महाराजा रणजीत सिंहकडून रक्षण घेतले. त्याबदल्यात त्याने 1813 साली कोहिनूर महाराजा रणजीत सिंहला दिला. लाहोरच्या तहात राजा दलीप सिंहने कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीकडे सोपवला.

हे ही वाचा – 

Man Booker Prize 2018 :- 50 वा मॅन बुकर मिळवणाऱ्या एना बर्न्स ठरल्या पहिल्या नाॅर्थ आयरिश महिला

या कारणामुळे कन्हैया कुमारला होऊ शकते अटक


 

Loading...

या कारणामुळे कन्हैया कुमारला होऊ शकते अटक

Previous article

ठरलं रे ! प्रियांका चोप्रा – निक जोन्सच्या लग्नाची तारिख पक्की, या राज्यात होणार शुभमंगल सावधान

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *