Royal politicsटॉप पोस्ट

ट्रंप-किम एेतिहासिक भेटीत घडल्या अनेक महत्वाच्या घटना 

0

सिंगापूर –

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप व नाॅर्थ कोरियाचे लीडर किम किम जाँग-उन यांच्या सिंगापूर येथे पार पडलेल्या एेतिहासिक भेटीत अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 1953 च्या कोरियन युध्दानंतर दोन्ही देशातील नेत्यांमध्ये एकदाही भेट झाली नव्हती. दोन्ही देशाचे नेते कोरियन युध्दानंतर फोनवर देखील कधी बोलले नव्हते.

Loading...

दोन्ही देशातील नेत्यांमध्ये आण्विक निःशस्त्रीकरण करण्यासंबधी देखील करार करण्यात आला आहे. करारनुसार, नाॅर्थ कोरिया स्वताजवळील सर्व आण्विक शस्त्र नष्ट करणार आहे. तसेच दोन्ही देश हे शांतता व विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याशिवाय अमेरिका साउथ कोरिया बरोबर होणारा युध्द सराव देखील थांबवणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मुलाखतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ट्रंप म्हणाले की, किम जाँग-उन यांच्या बरोबरची भेट ही एक नवीन इतिहास लिहिणार आहे. ही भेट फायदेशीर ठरली आहे.  किम यांनी  क्षेपणास्त्र चाचण्या आधीच बंद केल्या असुन, अणवस्त्र पुर्णपणे नष्ट केल्या नंतरच नाॅर्थ कोरियावरील निर्बंध्द हटवले जातील.

41 मिनिटे चाललेल्या या एेतिहासिक बैठकीनंतर  किम जाँग-उन म्हणाले की, आम्ही भुतकाळाला मागे टाकले असुन , जग एक नवीन बदल बघेल.

बैठकीत चर्चा करण्यात आलेले महत्वाचे मुद्दे – 

– करारानुसार नाॅर्थ कोरिया आण्विक शस्त्र पुर्णपणे नष्ट करणार आहे.

– दोन्ही देश एकमेकांच्या ताब्यात असणाऱ्या नागरिकांची सुटका करणार आहेत.

– दोन्ही देश शांतता व विकासासाठी पुढे येणार आहेत.

-अमेरिका साउथ कोरिया बरोबर करत असलेला युध्द सराव थांबणार आहे.

-आण्विक शस्त्र पुर्णपणे नष्ट झाल्यांनतरच नाॅर्थ कोरियावरील निर्बंध्द हटवण्यात येणार आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रं मंत्री माईक पँपेओ यांनी फोनवरून जपान आणि साउथ कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना बैठकीची माहिती दिली .

(PHOTO INPUT:- FACEBOOK/THE WHITE HOUSE)

Loading...

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

Previous article

राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त भय्युजी महाराज यांची आत्महत्या

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *