मुख्य बातम्या

खाद्यभटकंती :- पुणेकरांचे कडक चहा प्रेम…

0

2014 च्या निवडणुकीनंतर संपूर्ण देश मध्ये ‘चायवाला‘ हा शब्द चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्रातील आपल्या पुण्यात देखील अनेक चहाप्रेमी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. पुण्यात अजून ही बर्‍याच प्रमाणात जुनी अमृततुल्य पाहण्यास मिळतात. पुण्यात चहाला जणू अमृताची उपमा दिली आहे असेच वाटते.

पुणेकर आणि चहा हे समीकरणच बनल्याने पुण्यात प्रत्येक ठिकाणी आणि चौकाचौकात आपल्याला अनेक प्रसिध्द असे अमृततुल्य पाहण्यास मिळतात. सध्या ह्या अमृत्युल्याची संख्या देखील चांगलीच वाढत आहे.  पुणेकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमित जाण्याऱ्या अनेकांना आपल्या कार्यालयातील कामाची सुरुवात ही चहा पिऊन केल्याशिवाय चैईनच पडत नाही, त्यात विशेष  म्हणजे पुणेकरांना उन्हाळ्यात देखील चहा लागतो.

Loading...

म्हणूनच सध्या पुण्यात अनेक नवीन अमृततुल्य झालेले दिसून येतात. पण यामध्ये सुद्धा पुण्यातील जुने आणि प्रसिध्द अमृततुल्य आहे. जर तुम्हाला अस्सल पुणेरी चहाची चव घेयची असेल तर तुम्ही ह्या नामांकित टि-स्टोलला भेट द्यायलाच हवी!

डेक्कनचा लेमन टी. फर्ग्युसन रोडवरील रानडे इन्स्टिट्युटच्या शेजारच्या गल्लीत अप्रतिम असा लेमन टी मिळतो. त्याचबरोबर ज्यांना दुधाचा चहा आवडत नाही त्यांच्यासाठी हा चहा एक चांगली पर्वणीय ठरतो. तेथील चहावाले चहाच्या कपात लिंबाचं पाणीही टाकतात. त्यामुळे या चहाला एक वेगळेसे रूप प्राप्त होते.

ज्या लोकांना गोड़ चहा पिण्याची इच्छा असेल तर त्यांनी कमला नेहरू पार्क समोरील बासुंदी चाहाला एकदा भेट द्यावी. हा चहा पिण्याऱ्याला बासुंदी पिल्याच फील देऊन जातो आणि ह्या चहाचा रंग देखील इतर चहापेक्षा वेगळा आहे.

नारायण पेठमधील टी हाउस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याचा आणि नोकरदारांचा हा आवडता चहा आहे. सकाळी आणि सायंकाळी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते.

जर तुम्हाला कमी पैशामध्ये चहाची मजा घ्यायची असेल तर तुम्ही पत्र्या मारुती चौकातील टी हाऊसला भेट द्या. आणि वैशिष्ट्य म्हणजे या चहाची सर्विस तुम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असाल तरी तुम्हाला मिळते.

खास चहाच्या प्रियकरानंसाठी असलेला प्रेमाचा चहा देखील मंडईमध्ये आपल्याला एक चहाचा आणि प्रेमाचा वेगळाच अनुभव देऊन जातो. म्हणूनच एकदा तरी ह्या सर्व हटके टी स्टोलला भेट द्यायला हवी.


हे ही वाचा- 

IND Vs WI:- कर्णधार कोहली आशियाचा ‘किंग’


 

Loading...

भाजप आमदार राम कदम यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

Previous article

सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा काहीही अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *