Royal Entertainmentमुख्य बातम्या

केसांना फाटे फुटत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

0

जेव्हा केसांचे शेंडे दोन भागात विभागले जातात त्याला फाटे फुटणे असे म्हणतात. केसांना फाटे फुटले कि, केस निर्जीव, कोरडे दिसू लागतात. केसांना फाटे फुटल्यास केसांची वाढ खुंटते.
बहुतेक स्त्रियांना केसांना फाटे फुटण्याची समस्या असते. केमिकल युक्त शाम्पूचा अती वापर, धूळ, प्रदूषण, तीव्र सूर्यप्रकाशात काम करणे यामुळे केसांना फाटे फाटे फुटत असतात. केसांना फाटे फुटू नये म्हणून आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
केसांसाठी शाम्पू निवडताना सौम्य आणि नैसर्गिक घटक युक्त शाम्पू निवडा. केसांना शाम्पू करण्याआधी अर्धा तास केसांना नारळ तेलाने मालिश करा. नियमितपणे असे केल्यास केसांना फाटे फुटत नाही.
केसांना फाटे फुटत असतील तर एक चांगली पिकलेली पपई घ्या. तिचा काही भाग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये ताजे दही मिसळून चांगले एकजीव पेस्ट तयार करा.
ही पेस्ट केसांच्या त्वचेवर व केसांना लावा. अर्धातासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा. महीन्यातून एकदा हा प्रयोग करा. असे केल्यास केसांना फाटे फुटत नाही. प्रदूषण, धूळ, माती आणि हवेपासून केसांना वाचविण्यासाठी ते बांधून ठेवावेत.
केसांचे फाटे कमी करण्यासाठी मेथीदाणे  फार लाभदायक आहेत. चार चमचे दह्यात मेथीचे दाणे अर्धा तास भिजवून  नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हे मिश्रण केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. नंतर केस कोमट पाण्याने धुवा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होऊन फाटे निघून जातील आणि केसांना मुलायमपणा येईल.
केसांना फाटे फुटत असतील त्यावर अंड्याचा पिवळा बलक लावा. अंड्यात प्रथिने आढळतात. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी अंड्याचा वापर केला जातो. अंड्यामुळे केसांची कंडीशनिंग देखील होते. आणि केस मजबूत होतात.
चांगल्या केसांसाठी योग्य आणि पोषक आहार आवश्यक आहे. पालेभाज्या, फळे, बदाम, मासे, नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

टायगर श्रॉफचे बॅक टू बॅक 3 धमाके

Previous article

ह्या 6 राशींची वाईट वेळ संपली, मिळेल इतके धन कि मनातील इच्छा होतील पूर्ण

Next article

You may also like

Comments

Comments are closed.