Royal Entertainmentटॉप पोस्ट

Karwan Movie Trailer : तीन अनोळखी व्यक्ती, दोन डेड बाॅडी आणि आयुष्यभर लक्षात राहणार प्रवास

0

इरफान खान, दलकिर सलमान आणि मिथिला पालकर यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘कारवां’ या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. या चित्रपटाची कहानी तीन व्यक्तींच्या अवतीभवती फिरताना दिसते. एका डेड बाॅडीच्या शोधात निघालेल्या तिघांच्या ट्रीपची ही कहानी आहे.

तीन अनोळखी व्यक्ती, अचानक एकमेंकाना भेटतात व एका नवीन प्रवासा सुरूवात होती अशी काहीशी कहानी या चित्रपटाची आहे.  तीन अनोळखी व्यक्ती, दोन डेड बाॅडी आणि आयुष्यभर लक्षात राहणार असा प्रवास अशीच या चित्रपटाची टॅग लाईन आहे.

Loading...

मिथिला पालकर व दलकिर सलमान हे दोघेही या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. मिथिला पालकरने या आधी वेब सिरीज व मराठी चित्रपटात काम केले असून दलकीर सलमानने मल्याळम चित्रपटात काम केले आहे.

कारवां चा बहूतांश भाग हा केरळ मध्ये चित्रित करण्यात आलेला आहे.

तसेच आकर्ष खुरानाने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. रोनी स्क्रूवाला व प्रिती राठी गुप्ता या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत.

येत्या 3 आॅगस्टला कारवां रिलीज होणार असून, याच दिवशी एश्वर्या राय बच्चन, राजकूमार राव आणि अनिल कपूर यांची प्रमुख भुमिका असलेला फन्ने खां हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे.

Loading...

आवाज वाढव ‘डीजे’ वर आता कडक कारवाई; न्यायलयाने भरला पालिकांना दम

Previous article

‘झिंगाट’ गाणं पुन्हा एकदा आलय तुम्हाला वेड लावायला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *