टॉप पोस्टराजकारण

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारास्वामी यांनी नाकारले नरेंद्र मोदी यांचे फिटनेस चॅलेंज

0

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हम फिट तो इंडिया फिट’ हे फिटनेस चॅलेंज नाकारले आहे. कुमारास्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मला शरीराच्या फिटनेस पेक्षा राज्याच्या विकासाची जास्त काळजी आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींचे फिटनेस चॅलेजमध्ये टॅग केल्यासाठी आभार देखील मानले व ते म्हणाले की, योगा व ट्रेडमील हे माझ्या रोजच्या जीवनातील व्यायामाचा एक भाग आहे.

Loading...

त्या आधी आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेस चॅलेजला प्रतिसाद देत स्वतःचा योगा करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारास्वामी व टेबल टेनिसपटू मनिका बत्राला टॅग करत फिटनेस चॅलेंज दिले होते.

तसेच युनियन स्पोर्टस मिनिस्टर राज्यवर्धन राठोड यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट’ हे चॅलेज सुरू केले होते. लोकांमध्ये व्यायामाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी या चॅलेंजची सुरूवात करण्यात आली होती.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/ HD KARUNASWAMY)

Loading...

महाराष्ट्रातून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारी संशयित व्यक्ती अटकेत ?

Previous article

बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन:- “मला बुरखा घालण्यास कोणीही सक्ती करू शकत नाही.”, इराण दौर्‍यातून माघार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *