Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘त्या’ व्हिडिओवरून करण जोहरची होणार चौकशी?

0

मुंबई –  गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ करण जोहरच्या पार्टीचा होता. या पार्टीत दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांच्यासह इतरही अनेक लोक दिसून आले होते. हा व्हिडीओ स्वतः करण जोहरने शूट केला होता.
गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज पार्टी करत असल्याचं बोललं जात होते. याच व्हिडिओला अनुसरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओचा फॉरेंसिक रिपोर्टही एनसीबीला मिळाला आहे. ज्यावरून स्पष्ट होत आहे की, व्हिडीओमध्ये कोणत्याच प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आज पुन्हा एकदा डीजी एनसीबी राकेश अस्थाना यांच्यासोबत डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा, जोनल हेड समीर वानखेडे आणि डीडीज मूथा अशोक जैन या अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक होऊ शकते. ज्यामध्ये 2019 मध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीओ संदर्भात करण जोहरची चौकशी करायची की, नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वतः करण जोहर याने या व्हिडीओबाबत इंस्टाग्रामवर आपले मत मांडत  खुलासा केला आहे. करण म्हणाला कि, “माझ्या घरी पार्टी करण्यात आली होती. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. आमच्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणण्यात आलेच नव्हते आणि कोणी त्याचं सेवनही केलं नव्हतं. मी ड्रग्सचं सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही.” असं तो म्हणाला होता.

 

View this post on Instagram

 
A post shared by Karan Johar (@karanjohar) on Sep 25, 2020 at 10:27am PDT

The post ‘त्या’ व्हिडिओवरून करण जोहरची होणार चौकशी? appeared first on Dainik Prabhat.

अक्षय कुमारवर जीवापाड प्रेम करत होती ही अभिनेत्री, परंतु संबंध तुटल्यानंतर गेली अमेरिकाला, आजही दिसते हॉट

Previous article

“दीदींच्या दैवी आवाजाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही’- राज ठाकरे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.