मुख्य बातम्या

बिहार निवडणुकीत कंगना रणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात….

0

शिवसेनेशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे अभिनेत्री कंगना राणौत चर्चेत आहे. बिहार निवडणुकीच्या दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि आता कंगनावर सर्वांचे लक्ष आहे. कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर कार्यालयाच्या बांधकामावर बीएमसीने हातोडा मारल्यानंतर कंगनानं शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं. त्यानंतर शिवसेना कंगना आणि भाजपा यांच्याविरोधात टीकास्त्र सोडत आहे.
या संपूर्ण घडामोडीत कंगना राणौतला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देणे असो वा बीएमसीच्या कारवाईवर भाजपाने केलेला विरोध..कंगनाच्या बाजूने भाजपा उभी राहिल्याचं दिसून येते. त्यामुळे बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार अशी चर्चा सुरु आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीएकडे सर्वात मोठे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणत्या दुसऱ्या स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही. कंगना राणौत वारंवार तिच्या राजकीय भूमिकेबद्दल सांगण्यास टाळत आलेली आहे. रविवारी कंगना मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राज्यपाल भवनात गेली. त्यानंतर ज्यावेळी ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कमळाचं फूल होतं.
महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बिहार निवडणुकीत कंगना रणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात…. InShorts Marathi.

….म्हणजे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचं समर्थन केलंय ; नवनीत राणांची टीका

Previous article

महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही तात्काळ थांबवा ; नवनीत राणांची राजनाथ सिंहांना विनंती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.