Royal Entertainmentमुख्य बातम्या

अबब…कंगनाचे दिवसाचे मानधन दीड कोटी

0

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आरोप आणि खळबळजनक विधाने करून प्रकाशझोत आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी झालेली कंगना खरेतर कायमच चर्चेत असते. त्यामुळे हल्ली सर्वच माध्यमांवर तिची विशेष दखल घेतली जात आहे. करिअरचा विचार न करता खरेतर करिअर पणाला लावून सगळ्यांशी पंगा घेणाऱ्या कंगनाची नक्की मालमत्ता किती, तिचे उत्पन्न किती असे प्रश्‍न कोणालाही पडणे साहजिकच आहे. त्यातूनच एका इंग्रजी माध्यमाने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंगना दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रूपये मानाधन घेते असा दावा त्यात करण्यात आला आहे.
संबंधित वृत्तानुसार कंगना एका चित्रपटासाठी 11 कोटी रूपये मोजून घेते. याशिवाय अनेक जाहीरातीही ती करते. तसेच एका दिवसाच्या प्रचारासाठी तिची फी दीड कोटी रूपये आहे. फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या यादीत कंगनाचे स्थान 70 व्या क्रमांकावर होते आणि 2019 या वर्षभरात तीने 19 कोटी रूपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला होता.
तेवढा तर ती टॅक्‍स भरते
फोर्ब्सने कंगनाचे उत्पन्न केवळ 19 कोटी दाखवल्यामुळे तिची बहिण रंगोली संतापली आहे. फोर्ब्सची ही यादी बोगस आहे व हे सगळे पीआरवाल्यांचे काम आहे. त्यांनी कंगनाचे जेवढे उत्पन्न दाखवले आहे, तेवढा तर आपली बहिण टॅक्‍स भरते असा दावा रंगोलीने केला आहे.
दरम्यान, कंगनाचे उत्पन्न यापेक्षा कैक पटीने जास्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र तिच्या अकाउंट विभागाशिवाय अन्य कोणाला याची माहिती नाही. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवली गेली आहे.
कंगनाने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ती स्वत: मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तसेच तिने अन्य ठिकाणीही मोठी रक्कम गुंतवली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
The post अबब…कंगनाचे दिवसाचे मानधन दीड कोटी appeared first on Dainik Prabhat.

अबब…कंगनाचे दिवसाचे मानधन दीड कोटी

Previous article

संजय दत्तची पत्नी मान्यता झाली भावूक म्हणाली,’रुक जाना नहीं तू कहीं हार के…’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.