Royal politicsटॉप पोस्ट

गोरखपूर दुर्घटना प्रकरणातील डॉ. कफील खान यांच्या भावावर आज्ञातांकडून गोळीबार

0

गोरखपूर :-

गोरखपूर मधील डॉ. कफील खान यांच्या लहान भावावर काही आज्ञातांनी रविवारी रात्री गोळीबार केल्याची घटना समोर आली. गोरखपुर दुर्घटनामुळे चर्चेत आलेले हेच ते डॉ. कफील खान. या गोळीबारात त्यांचा भाऊ(कासिफ जमील) बचावला असून त्यांना  तीन गोळ्या लागल्याने  एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading...

“माझा भाऊ जमील याला तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी या आधीच सांगितले होते की आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, माझ्या कुटुंबाला निशाणा बनवलं जात आहे.” असे डॉ.कफील खान यांच्या कडून सांगण्यात आले.

काय आहे गोरखपूर दुर्घटना प्रकरण-   

बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाचे लाखात असलेले बिल थकल्याने ऑक्सिजन परवणार्‍या कंत्राट कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. यामुळे ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने 5 दिवसात 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता.  यात बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कफील खान ला दोषी ठरवण्यात आले होते.

डॉ.  कफील खान-  

गोरखपूर दुर्घटनेमध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या डॉ. कफील खान यांना 7 महिन्यानंतर उच्च न्यायालयाने जमीन दिला आहे. एप्रिल महिन्यात त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. तुरुंगात असताना त्यांनी 10 पानी पत्र लिहिले होते. प्रशासनाकडून झालेल्या हालगर्जीपणा लपवण्यासाठी मला यात आडकवले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांची ही पत्र त्यांच्या पत्नीने प्रेस क्लब ऑफ इंडिया कडे सुपूर्त केली होती. मी मुलांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

या पत्रात डॉ. कफील खान यांनी लिहिले आहे  की, 13 ऑक्टोबरला सकाळी आदित्यनाथ योगी हॉस्पिटलमध्ये आले होते, त्यांनी मला नाव विचारात तुम्हीच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा परवली होती का असे विचारलं. मी, हो उत्तर दिल्यावर  ते चिडले. सिलेंडरची सुविधा   पुरवल्याने तुम्ही स्वताला होरो समजायला लागल्यात का असे विचारले. याला मी बघून घेईल असे देखील ते म्हणाले.

त्यांना वाटलं की माझ्यामुळे ही घटना मीडिया पर्यंत गेली परंतू मी मीडिया पर्यंत गेलोच नाही.  मीडिया इथपर्यंत आली. या नंतर मला धमक्या येऊ लागल्या, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जाऊ लागला. असे या पत्रात  डॉ. कफील खान यांच्याकडून लिहिण्यात आले आहे.

या घटनेनंतर त्यांच्याकडून पुन्हा सांगण्यात आले आहे की माझ्या कुटुंबाला निशाणा बनवला जात आहे.

 

Loading...

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला पाहिजे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय – रिपोर्ट

Previous article

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *